HomeBollywoodमनोरंजनसृष्टी पुन्हा हादरली ! बॉलीवूडमधील दिग्गज दिग्दर्शकाचे निधन, ऋषी कपूर पासून ते...

मनोरंजनसृष्टी पुन्हा हादरली ! बॉलीवूडमधील दिग्गज दिग्दर्शकाचे निधन, ऋषी कपूर पासून ते सलमान खानपर्यंतच्या चित्रपटांना केले होते दिग्दर्शित…

वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये मनोरंजनसृष्टीमधून अनेक वाईट बातम्या समोर येत आहेत. बॉलीवूडमधील आणखी एका नामी व्यक्तीने जगाचा निरोप घेतला आहे. चित्रपट दिग्दर्शक नितिन मनमोहन यांचे वयाच्या ६० व्या वर्षी गुरुवारी मुंबईमध्ये निधन झाले. ते ३ डिसेंबर पासून हॉस्पिटलमध्ये भरती होते आणि गेल्या १५ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. त्यांची प्रकृती खूपच गंभीर सांगितली जात होती आणि आज सकाळी त्यांनी अंतिम श्वास घेतला.

चित्रपट निर्माते नितिन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका आला होता ज्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सतत खालावत चालली होती. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते.

त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने आज त्यांच्या निधनाची दुःखद बातमी आली आहे. त्याचवेळी नितीन मनमोहन यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. नितीन मनमोहन चित्रपटांमधील फेमस विलेन मनमोहनचा मुलगा आहे.

ज्यांनी ब्रह्मचारी, गुमनाम आणि नया जमाना सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय करून दर्शकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले होते. आपल्या वडिलांप्रमाणे नितिन मनमोहन देखील फिल्म इंडस्ट्रीशी जोडले गेले होते. त्यांनी आपल्या करियरमध्ये अनेक मोठ-मोठे चित्रपट दिग्दर्शित केले. सलमान खानचा रेडी चित्रपट देखील त्यांनी दिग्दर्शित केला होता.

यामध्ये बोल राधा बोल (१९९२), लाडला (१९९४), यमला पगला दीवाना (२०११), आर्मी स्कूल, लव के लिए कुछ भी करेगा (२००१), दस (२००५), चल मेरे भाई (२००१), महा-संग्राम (१९९०), इंसाफ: द फाइनल जस्टिस (१९९७), दीवानगी, नई पड़ोसन (२००३), अधर्म (१९९२),‘बाघी, ईना मीना डीका, तथास्तु, टैंगो सहित अनेक मोठे चित्रपट आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts