HomeBollywoodमोठ-मोठ्या प्रोडक्शन हाऊसचे मालक आहेत बॉलीवूडचे 'हे' स्टार्स, छप्परफाड करतात कमाई...

मोठ-मोठ्या प्रोडक्शन हाऊसचे मालक आहेत बॉलीवूडचे ‘हे’ स्टार्स, छप्परफाड करतात कमाई…

बॉलीवूड चे तारे कमावण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. हे सेलिब्रिटी आपली कमाई वाढवण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय करून पाहतात. कोणी ब्रांड एंन्डोर्समेंट करतात तर कोणी व्यवसाय करण्यासाटी बाहेर पडतात. बॉलीवूड मधील काही असे पण सेलिब्रिटी आहेत ज्यांचे स्वतः चे प्रोडक्शन हाउस आहे. हे अभिनेते आपल्या चित्रपटातून चांगली कमाई करतात तसे असून देखील हे सेलिब्रिटी प्रोडक्शन हाउस च्या माध्यमातून कमावतात. मागील काही वर्षांमध्ये काही बॉलीवूड कलाकारांनी प्रोडक्शन मध्ये आपली आवड दाखवलेली आहे. चला तर पाहूया असे कोणते कलाकार आहेत जे स्वतः चे प्रोडक्शन हाउस चालवतात.

आमीर खान: बॉलीवूड चा मिस्टर परफेक्शनिस्ट समजले जाणारा आमीर खान ने १९९९ मध्ये आपल्या नावाचे प्रोडक्शन हाउस सुरु केले होते. त्याच्या निर्मितीमधील काही सर्वोत्तम चित्रपट दिल्ली बेली, लगान, दंगल, धोबी घाट आहेत.

अनुष्का शर्मा: अभिनेत्री अनुष्का शर्मा तसे तर आई बनल्यामुळे मोठ्या पडद्यापासून लांब राहिलेली आहे. अभिनेत्रीने तिचा भाऊ कर्नेश सोबत ऑक्टोंबर २०१३ मध्ये ‘क्लीन स्लेट फिल्मस्’ सुरु केले होते. परी, एन एच १०, फिल्लौरी सारखे चित्रपट या प्रोडक्शन हाउस ने बनवले आहेत.

अक्षय कुमार: बॉलीवूड चा खिलाडी अक्षय कुमार ‘हरी ओम एंटरटेनमेंट’ प्रोडक्शन चालवतो. चित्रपट ‘ओ माय गॉड’ याच प्रोडक्शन हाउस मधून बनलेली आहे.

प्रियांका चोपडा: बॉलीवूड पासून ते हॉलीवूड पर्यंत आपली ओळख निर्माण करणारी प्रियांका चोपडा अभिनय आणि व्यवसाय च्या सोबतच तिचे प्रोडक्शन हाउस ‘पर्पल पैबल पिक्चर’ चालवते.

फरहान अख्तर: अभिनेता फरहान अख्तर ने ‘जिंदगी न मिलेगी दोबारा, गली बॉय, डॉन आणि दिल धडकने दो सारखे चित्रपट त्याच्या स्वतः च्या प्रोडक्शन हाउस ‘एक्सेल एंटरटेनमेंट’ मधून बनवले आहेत.

सलमान खान: बॉलीवूड इंडस्ट्री चा दबंग समजला जाणारा सलमान खान ने २०११ मध्ये त्याच्या नावाने ‘सलमान खान फिल्मस्’ सुरु केले होते. सलमान खान ने भरपूर चित्रपट त्याच्या प्रोडक्शन हाउस मधून बनवले आहेत.

शाहरुख खान: बॉलीवूडचा किंग खान समजले जाणारा शाहरुख खान अभिनयाबरोबर प्रोडक्शन हाउस देखील चालवतो. अभिनेता त्याची पत्नी गौरी खान बरोबर ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ प्रोडक्शन हाउस चालवतो. शाहरुख ने चित्रपट ओम शांती ओम, रावण, डियर जिंदगी आणि हैपी न्यू ईयर सारखे चित्रपट बनवले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts