HomeBollywoodमनोरंजन जगतामधून आणखी एक वाईट बातमी, प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचे निधन...

मनोरंजन जगतामधून आणखी एक वाईट बातमी, प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचे निधन…

मनोरंजन जगतामधून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज चित्रपटा निर्माता आणि प्रोड्यूसर सुरेश जिंदल यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. असे म्हंटले जात आहे कि गंभीर आजाराने ग्रस्त होते आणि एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून ते दिल्लीच्या एका हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होते. सुरेश जिंदल ८० वर्षाचे होते.

दिल्लीच्या लोधी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाने एक निवेदन जारी केले ज्यामध्ये म्हंटले आहे कि नेहमीच आमच्या हृदयामध्ये सुरेश जिंदल, अतिशय दु:खासह कळवत आहोत कि सुरेश जिंदल यांचे निधन झाले आहे.

सुरेश जिंदलने हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी भूमिका बजावली आहे. वास्तविक त्यांनी इंडस्ट्रीला रजनीगंधा, कथा आणि सत्यजीत चा शतरंज के खिलाड़ी सारख्या चित्रपटांचे निर्माण केले होते. त्यांचे चित्रपट भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये मैलाचा दगड मानले जातात. सुरेश जिंदल यांना त्यांचं गुणवत्तेसाठी फ्रेंच सरकारने ‘शेव्हलियर डेस ऑर्डे डेस आर्ट्स एट डेस लेट्रेस’ हा पुरस्कारही दिला होता.

सुरेश जिंदल यांच्या निधनाची पुष्टी प्रसिद्ध गीतकार अमित खांना यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केली आहे. सुरेश जिंदल आणि अमित खन्ना यांच्यामध्ये खूपच घट्ट मैत्री होती. त्यांचे अंतिम संस्कार २५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता लोधी रोड स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत.

सुरेश जिंदल भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध निर्माता होता, ज्यांनी चित्रपट क्षेतत्रामध्ये अनेक उत्कृष्ट क्लासिकल चित्रपट केले. १९७० च्या दशकामध्ये सुरेश जिंदल भारतातील अशा निर्मात्यांपैकिक होते ज्यांनी लीगमधून हटून चित्रपट निर्मिती करण्याचे स्वप्न साकार केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts