HomeBollywoodबॉलीवूडमध्ये शोककळा ! प्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शकाचे नि'धन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला...

बॉलीवूडमध्ये शोककळा ! प्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शकाचे नि’धन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

मनोरंजन जगतामधून एक दुखद बातमी समोर आली आहे. दिग्गज फिल्म रायटर, दिग्दर्शक आणि प्रोड्युसर राकेश कुमार आता या जगामध्ये राहिले नाहीत. ८१ व्या वर्षी गंभीर आजारामुळे राकेश कुमारचे निधन झाले. या बातमीनंतर बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

माहितीनुसार राकेश कुमार दीर्घकाळापासून कॅन्सरसारख्या खतरनाक आजाराशी झुंज देत होते आणि अखेर १० नोव्हेंबर रोजी ते आपल्या जीवनाची लढाई हरले. माहितीनुसार दिग्दर्शकाने १० नोव्हेंबर २०२२ रोजी अंतिम श्वास घेतला. दिग्दर्शकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

राकेश आपल्या पाठीमागे आपली पत्नी आणि दोन मुले सोडून गेले आहेत. निर्माता दिग्दर्शकाच्या आठवणीमध्ये रविवारी म्हणजेच १३ नोव्हेंबर रोजी एक प्रार्थना सभा ठेवण्यात आली आहे. मुंबईच्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब, गार्डन नंबर ५, लोखंडवाला, अंधेरी वेस्ट मध्ये प्रार्थना सभा संध्याकाळी ४ ते ५ वाजतान होणार आहे.

राकेश कुमारला त्यांच्या खून पसीना, दो और दो पांच, मिस्टर नटवरलाल, याराना, जॉनी आई लव यू, दिल तुझको दिया’, कौन जीता कौन हारा, कमांडर आणि सूर्यवंशी’ (१९९२) सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. याशिवाय त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. यामध्ये दिल बेचारा प्यार का मारा, देश विदेश आणि दिल पे मत ले यार सारखे चित्रपट सामील आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts