बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतामध्ये आली आहे. ती सीटाडेल या हॉलीवूड चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी भारतामध्ये आली आहे. यादरम्यान प्रियांका चोप्रा मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचली. तिच्यासोबत तिची मुलगी मालती देखील होती.
प्रियांका चोप्राचे मंदिरामधील अनेक फोटोज आणि व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये ती आपल्या टीमसोबत सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी पोहोचली. फोटोमध्ये प्रियांका चोप्राला ग्रीन कलरच्या सूटमध्ये पाहू शकता. तर तिच्यासोबत मुलगी मालती देखील दिसत आहे.
प्रियांका चोप्राचे पूजा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीचे चाहते व्हिडीओला खूप पसंती देत आहेत. त्याचबरोबर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. याशिवाय अभिनेत्रीने पाळ्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मालती मेरीसोबत सिद्धिविनायक मंदिरामधील फोटो शेयर केले आहेत. ज्यावर चाहते भरभरून प्रेम दाखवत आहेत.
प्रियांका चोप्रा नुकतेच चर्चेमध्ये आली होती जेव्हा तिने बॉलीवूडबद्दल उघडपणे वक्तव्य केले होते. तिने म्हंटले होते कि, बॉलीवूडमध्ये मिळत असलेल्या कामाने मी खुश नव्हते. मी याबद्दल पहिल्यांदाच बोलत आहे कारण याबद्दल बोलणे असुरक्षित वाटते. देसी हिट्सची अंजलि आचार्यने मला एकदा कोणत्यातरी म्युझिक व्हिडीओमध्ये पाहिले आणि त्यांनी मला फोन केला, त्यावेळी मी सात खून माफचे शुटींग करत होते.
अभिनेत्रीने पुढे म्हंटले कि अंजलीने मला विचारले कि मी अमेरिकामध्ये मला म्युझिक करियर बनवायचे आहे का. मी त्यावेळी बॉलीवूडमधून बाहेर पडण्याची संधी शोधात होते, मला इंडस्ट्रीमध्ये एका कोपऱ्यामध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला जात होता. जे लोक मला कास्ट करत नव्हते, मी पॉलिटिक्सने ठाकले होते आणि मला एका ब्रेकची गरज होती.
View this post on Instagram
View this post on Instagram