बॉलीवूड ची डिंपल गर्ल प्रीती झिंटा अलीकडे चित्रपटांच्या पासून लांब तिच्या मुलांचा सांभाळ करण्यात व्यस्त आहे. प्रीती ने अलीकडे सोशल मिडीयावर तिची जुळी मुले जय आणि जिया चे फोटो शेअर केले आहेत. या क्युट फोटो मध्ये प्रीती दोघांनाही प्रेम करताना दिसत आहे. तर जय आणि जिया सुटकेस मध्ये बसलेले दिसत आहेत. तथापि, फोटो मध्ये दोघांचे चेहरे समोरून दिसत नाहीत.
प्रीती झिंटा चा मुलगा जय याने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे तर मुलगी जिया गुलाबी रंगाच्या ड्रेस मध्ये गोंडस दिसत आहे. मुलांचा फोटो शेअर करत प्रीती झिंटा ने लिहिले आहे कि – हे चकित करणारे आहे कि जेव्हा देखील मी प्रवासाला निघणार असते तेव्हा मुलांना लगेच समजते. माझ्या साठी आवरणे खूप अवघड होते, कारण ते दोघे सुटकेस मध्ये येऊन बसतात. मला वाटते कि पुढील वेळेस त्यांना माझ्या बैगेत पैक करून घेऊन जावे.
याच्या आधी बाल दिनाच्या म्हणजेच १४ नोव्हेंबर ला देखील प्रीती झिंटा ने इंस्टाग्राम वर जुळ्या मुलांचा खूप सुंदर फोटो शेअर केला होता. या फोटो मध्ये ती मुलांना मिठी मारताना दिसत आहे. तथापि, या फोटो मध्ये देखील मुलांचे चेहरे दिसत नव्हते. तर, मुलांच्या पहिल्या वाढदिवसाला देखील प्रीती ने दोन वेगवेगळे फोटो शेअर केले होते. प्रीती झिंटा ने २०१६ मध्ये अमेरिकन फायनेंशिअल एनालीस्ट जीन गुडइनफ सोबत लग्न केले.
प्रीती झिंटा चा पती जीन गुडइनफ वयाने तिच्या पेक्षा १० वर्ष लहान आहे. प्रीती जिथे ४६ वर्षांची आहे तर जीन देखील ३६ वर्षांचा आहे. ५ वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते नंतर दोघांनी २९ फेब्रुवारी २०१६ ला लॉस एंजिलीस मध्ये विवाह केला. प्रीती झिंटा सोबत जीन गुडइनफ ची भेट फेसबुक वर चाहत्यांच्या लाईव चैट दरम्यान झाली होती. जीन लॉस एंजिलीस च्या सैटा मोनिका मध्ये फाईनेंशिअल एनालीस्ट आहे.
फेब्रुवारी २०१६ मध्ये लग्नाच्या ५ वर्षानंतर प्रीती झिंटा नोव्हेंबर २०२१ मध्ये सरोगेसी द्वारे जुळ्या मुलांची आई बनली. प्रीती झिंटा ने २३ वर्षाची असताना चित्रपट इंडस्ट्री मध्ये ‘दिल से’ मधून अभिनयाच्या जगात सुरुवात केली. प्रीती ने तेलुगु, पंजाबी आणि इंग्लिश चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. प्रीती झिंटा ची आईपीएल टिम देखील आहे, ज्याचे नाव किंग्स इलेवन पंजाब आहे.
View this post on Instagram