HomeEntertainmentदगडूला मिळाली त्याची रियल लाईफ प्राजक्ता ? प्रथमेश परबच्या ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना...

दगडूला मिळाली त्याची रियल लाईफ प्राजक्ता ? प्रथमेश परबच्या ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधान…

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता प्रथमेश परब सध्या खूपच चर्चेमध्ये आला आहे. बालक पालक, टाइमपास, टकाटक सारखे सुपरहिट मराठी चित्रपट देणारा प्रथमेश सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय असतो. आपल्या अभिनयामधून त्याने दर्शकांची मने जिंकली आहेत.

टाइमपास ३ आणि टकाटक २ चित्रपटांमुळे तो गेल्या महिन्यापासून खूपच चर्चेमध्ये आहे. टाइमपास चित्रपटामधील प्राजूसाठी वेडा असलेला दगडू तुम्ही पाहिला असेल पण सध्या दगडूच्या रियल लाईफमध्ये देखील प्राजू आली आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.

नुकतेच अभिनेता प्रथमेशने दिवाळीच्या निमित्ताने काही फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये त्याच्यासोबत एक मुलगी देखील दिसत आहे जी त्याची गर्लफ्रेंड असल्याचे सांगितले जात आहे. निमित्त जरी दिवाळीचं असलं तरीदेखील नात्यांचं साजरं होणं महत्वाचं, असे कॅप्शन देत त्याने हे फोटो शेयर केले आहेत.

सध्या प्रथमेशने शेयर केलेले फोटो त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याचे काम करत आहेत. यामुळे प्रथमेश रिलेशनशिपमध्ये असल्याचे देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागल्या आहेत. पारंपारिक कपड्यांमध्ये दोघे खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोवर काही चाहत्यांनी दादूस आमची वहिनी काय? असे देखील अभिनेत्याला विचारले आहे.

दोघांनी दिवाळीचे निमित्त साधून खास फोटोशूट करून घेतले आहे. फोटोमध्ये प्रथमेशसोबत दिसत असलेल्या मुलीचे नाव क्षितिजा घोसाळकर असे आहे. ती एक मॉडेल तसेच कन्टेंड रायटर आहे. प्रथमेश आणि क्षितिजा यांनी याआधी देखील फोटो शूट केले आहे. दोघांचे फोटो सोशल मिडियावर पाहायला मिळतात. या चर्चांमध्ये आता अभिनेता काय उत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kshitija Ghosalkar (@miles_in_style)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts