HomeEntertainmentप्रभासच्या चाहत्यांसाठी ‘गुड न्यूज’ सुपरस्टार प्रभासने मुलाखतीदरम्यान आपल्या लग्नासंबंधी केला मोठा खुलासा,...

प्रभासच्या चाहत्यांसाठी ‘गुड न्यूज’ सुपरस्टार प्रभासने मुलाखतीदरम्यान आपल्या लग्नासंबंधी केला मोठा खुलासा, म्हणाला; ‘ मी लग्न करणार पण…’

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार प्रभास नेहमीच चर्चेमध्ये असतो. बाहुबलीच्या यशानंतर त्याला जगभरामध्ये ओळखले जाऊ लागले आहे. जणू तो तरुणांच्या गळ्यामधील ताईतच बनला आहे. प्रभासच्या चित्रपटासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

काही दिवसांपूर्वीच प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. चित्रपटाच्या ट्रेलरला दर्शकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला गेला. पण चित्रपटामधून प्रभासचा लुक मात्र चाहत्यांना खूपच आवडला. चित्रपटामध्ये प्रभाससोबत बॉलीवूड अभिनेत्री कृती सनॉन देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.

यामुळेच सध्या प्रभास खूपच चर्चेमध्ये आहे. नुकतेच प्रभास आणि कृती सनॉन रिलेशनमध्ये असल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. यावर दोघांकडून अद्याप काही असे अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. नुकतेच प्रभासने एका मुलाखतीदरम्यान आपल्या लग्नाबद्दल वक्तव्य केले आहे.

प्रभासने कोणासोबत लग्न करणार हे सांगितलेले नाही तर कधी लग्न करणार हे सांगितले आहे. सुपरस्टार प्रभास लवकरच नंदामुरी बालकृष्णाच्या अनस्टॉपेबल २ या टॉक शोमध्ये पाहायला मिळणार आहे. नुकताच या शोचा प्रोमो रिलीज झाला आहे.

शोमध्ये प्रभास खूपच धमाल करताना पाहायला मिळणर आहे. या शो दरम्यान प्रभासला त्याच्या पर्सनल लाईफविषयी देखील प्रश्न विचारले गेले आणि प्रभासने देखील त्याची मानमोकळेपणाने उत्तरे दिली. दरम्यान प्रभासला लग्न कधी करणार हा देखील प्रश्न विचारण्यात आला.

यावर प्रभास हसत हसत म्हणाली कि, आधी सलमान खानला लग्न करू द्या. मग मी करेन. प्रभासच्या या उत्तरानंतर सर्वजण हसू लागले. प्रभास आणि कृती हे एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा वरुण धवनच्या एका वक्तव्यामुळे पसरल्या होत्या. मात्र प्रभासने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by ahavideoin (@ahavideoin)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts