अभिनेता प्रभास साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार आहे. अभिनेता प्रभासचा एक लेटेस्ट फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्याचा लुक खूपच बदललेला पाहायला मिळत आहे. ज्यामुळे चाहते संभ्रमात आहेत.
तथापि हा फोटो पाहिल्यानंतर प्रभासचे चाहते खुश नाहीत तर नाराज झाले आहेत. प्रभास लवकरच आदिपुरुष चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. प्रभासच्या या नवीन अंदाजामुळे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले जात आहे. लोक हा फोटो पाहून त्याची खिल्ली उडवत आहेत.
प्रभासचा जो फोटो व्हायरल होत आहेत त्यामध्ये तो रजनीकांत आणि शिवा कुमारसोबत पाहायला मिळत आहे. फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, प्रभाससोबत असे काय झाले आहे? हा तर विचित्रच दिसत आहे. फोटो पाहिल्यानंतर लोकांच्या कमेंट्स देखील येण्यास सुरुवात झाली आहे. बहूतेक लोक हे विचारत आहेत कि प्रभासला काय झाले आहे. तर काही लोक त्याला चंबळ खोऱ्यातील डाकू म्हणत आहेत. पण प्रभासच्या या फोटोचे सत्य काही वेगळेच आहे.
प्रभासचा जो फोटो व्हायरल होत आहे तो मॉर्फ केलेला आहे. तथापि काही लोकांनी हि गोष्ट पकडली कि हा फोटो मॉर्फड केलेला आहे. प्रभासच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो आदिपुरुष या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. याशिवाय त्याचा सालार चित्रपट देखील रिलीज साठी तयार आहे. याशिवाय प्रभास प्रोजेक्ट K चित्रपटामुळे देखील खूप चर्चेमध्ये आहे.
What happened to #Prabhas𓃵 ? He’s looking horrible here 😰 pic.twitter.com/nnJYqDN3Jo
— Cinema Diary (@Cine__Diary) March 15, 2023