चित्रपट सृष्टीतील ‘बाहुबली’ प्रभास ची गर्लफ्रेंड कोण आहे? हा असा प्रश्न आहे, जो चाहत्यांसाठी कायमच कुतुहलाचे कारण राहिला आहे. जास्त दिवस झाले नाहीत कि जेव्हा हि चर्चा जास्त जोर धरू लागली होती कि कृती सेनन आणि प्रभास एकमेकांना डेट करत आहेत. दोघे ‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये सोबत काम करत आहेत.
तर बातमी अशी देखील आली कि प्रभास ने कृती सेनन ला चित्रपटाच्या सेट वर प्रपोज केले आणि दोघे लवकरच लग्न करणार आहेत. परंतु आता साउथ चा सुपरस्टार आणि आरआरआर फेम राम चरण ने असा काही खुलासा केला आहे कि, ज्यामुळे लाखो लोकांची मने तुटणार आहेत.
अलीकडेच प्रभास नंदामुरी बालकृष्ण चा टॉक शो ‘अनस्टोपेबल’ मध्ये आलेला होता. शो च्या एका सेगमेंट मध्ये प्रभास च्या जीवनाशी निगडीत काही गुपिते जाणून घेण्यासाठी राम चरण ला फोन लावण्यात आला. आता या फोन कॉल च्या सेगमेंट ची क्लिप सोशल मिडीयावर वायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये राम चरण स्पष्ट शब्दात सांगतो कि प्रभास चे सर्वात मोठे सिक्रेट हे आहे कि तो सिंगल आहे आणि त्याचे कोणासोबतहि प्रेम प्रकरण नाही.
प्रभास चा हा भाग शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. एपिसोड च्या या भागामध्ये बालकृष्ण च्या सांगण्यावर प्रभास त्याचा जोडीदार राम चरण ला फोन करतो. बालकृष्ण ला जाणून घ्यायचे होते कि प्रभास च्या जीवनात कोणी मुलगी आहे कि नाही? फोन कॉल वर राम चरण या गोष्टीची पुष्टी करतो कि प्रभास च्या जीवनामध्ये सध्यातरी कोणीही मुलगी नाही. तथापि, त्याने या गोष्टीवर मजेशीर प्रकारे म्हणाला कि प्रभास लवकरच कोणतीतरी चांगली बातमी देऊ शकतो. जसे राम चरण म्हणाला कि, प्रभास देखील एकदमच म्हणाला कि तू माझा मित्र आहे कि शत्रू.
शो च्या दरम्यान प्रभास आणि राम चरण ची बॉंन्डींग पाहून चाहते खूपच आनंदी झाले. एका चाहत्याने सांगितले कि, ‘त्यांची बॉन्डींग खूप चांगले आहे. हे प्रभास आणि राम चरण दोघांच्या चाहत्यांच्या साठी एका पार्टी पेक्षा कमी नाही’. आणखी एका चाहत्याने लिहिले कि, ‘पूर्ण शो मधील हा सर्वात चांगला भाग आहे. आम्हाला माहित नव्हते कि ते दोघे एवढे चांगले मित्र आहेत’.