HomeViralपोस्ट ऑफिस देत आहे बंपर कमाईची संधी, फक्त ५००० हजार रुपये गुंतवणूक...

पोस्ट ऑफिस देत आहे बंपर कमाईची संधी, फक्त ५००० हजार रुपये गुंतवणूक करून आयुष्यभर होईल कमाई…

पोस्ट ऑफिस हे पैसे गुंतवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही कसे पोस्ट ऑफिस ची फ्रेन्चायजी घेऊन चांगला व्यवसाय सुरु करू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त ५००० रुपयांची गरज आहे.

इंडिया पोस्ट च्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहिती नुसार, येणाऱ्या दिवसांमध्ये १० हजार नवीन पोस्ट ऑफिस उघडले जाणार आहेत. सरकार चे ध्येय आहे की प्रत्येक ५ किलोमीटर वर बैन्किंग ची सुविधा उपलब्ध करून देणे आहे. तर अशातच तुम्ही देखील घरामध्ये अथवा घराच्या जवळ पोस्ट ऑफिस उघडून कमाई करू शकता.

तुम्ही देखील घरी बसून पोस्ट ऑफिस सुरु करू शकता आणि प्रत्येक महिन्याला चांगली कमाई करू शकता. हा एक असा व्यवसाय मॉडेल आहे, ज्यामध्ये सुरुवातीला फक्त ५००० रुपये लागतात. पोस्ट ऑफिस फ्रेन्चायजी दोन प्रकारच्या असतात. तुम्ही फ्रेन्चायजी ऑफिस काढू शकता किंवा एजंट बनून कमाई करू शकता.

जिथे पोस्ट ऑफिस चे स्वतः चे नेटवर्क नाही तिथे, परंतु पोस्टल सर्विस ची गरज आहे तर तिथे फ्रेन्चायजी मॉडेल सुरु केले जावू शकते. तसेच, इंडिया पोस्ट चे एजंट फिरून पोस्टल सर्विस वर कमिशन च्या मदतीने चांगली कमाई करतात. हे एजंट स्टाम्प ची विक्री करू शकतात.

पोस्ट ऑफिस च्या फ्रेन्चायजी साठी तुम्हाला एप्लिकेशन फॉर्म भरून जमा करावा लागेल. त्याचे उत्तर तुम्हाला १५ दिवसांमध्ये मिळेल. त्यामध्ये कमिशन च्या आधारावर कमाई केली जाते. पगार मिळण्याची यात कोणतीही ठराविक रक्कम नसते. फ्रेन्चायजी घेण्यासाठी कमीत कमी १८ वर्ष पूर्ण असावे लागेल. कमीत कमी ती व्यक्ती ८ वी पास असणे महत्वाचे आहे. कॉम्प्यूटर ची माहिती असणे गरजेचे आहे. तुमचे ठिकाण हे सहजा सहजी मिळणारे असावे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts