HomeViralफक्त १०० रुपये गुंतवून पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेद्वारे बनतील २ लाख रुपये,...

फक्त १०० रुपये गुंतवून पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेद्वारे बनतील २ लाख रुपये, जाणून घ्या डीटेल्स…

पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये थोडीशी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतो. या योजनांमध्ये थोडे पैसे गुंतवून एक चांगला फंड कलेक्ट होऊ शकतो. पोस्ट ऑफिस अशा अनेक स्मॉल सेविंग्स स्कीमची सुविधा देते. याच योजनांमधील एक पोस्ट ऑफिस रिक्युरिंग डिपॉझिट खाते योजना आहे.

गुंतवणूकदारांना या योजनेत दररोज केवळ १०० रुपये गुंतवावे लागतील आणि सुमारे ५ वर्षात २ लाख रुपयांपेक्षा जास्त निधी फंड कलेक्शन होतो. जर तुम्हाला देखील पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये रस असेल आणि गुंतवणूक करायची असेल तर रिक्युरिंग डिपॉझिट स्कीम तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन बनू शकतो.

या स्कीममध्ये ५.८% वार्षिक व्याज मिळते. गुंतवणूकदार सहजपणे फक्त १०० रुपयांच्या गुंतवणुकीवर अकाऊंट उघडू शकतात. यानंतर १०-१० च्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची कोणतीही मर्यादा नाही.

गुंतवणूकदार त्यांच्या इच्छेनुसार पैसे जमा करू शकतात. गुंतवणूकदाराने दररोज १०० रुपये गुंतवले तर दरमहा सुमारे ३००० रुपये जमा होतात. त्यानुसार ही रक्कम संपूर्ण ५ वर्षात २.१० लाख रुपयांपर्यंत जाते. व्याजाची एकूण रक्कम २९,०८९ रुपये आहे.

या स्कीममध्ये सिंगल आणि जॉइन्ट दोन्ही अकाऊंट उघडले जाऊ शकतात. स्कीमच्या मॅच्युरिटीला ५ वर्षाचा कालावधी लागतो. इतकेच नाही तर गुंतवणूकदार या योजनेच्या आधारावर लोक देखील घेऊ शकतात. १२ हप्ते पूर्ण केल्यानंतर तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या ५०% रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकता. तथापि कर्जाचा व्याजदर २ टक्क्यांपेक्षा जास्त असतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts