HomeLifeStyleभुवयांच्या बनावटी वरून जाणून घेऊ शकता किती लकी आहात तुम्ही, महिलांच्या स्वभावाविषयी...

भुवयांच्या बनावटी वरून जाणून घेऊ शकता किती लकी आहात तुम्ही, महिलांच्या स्वभावाविषयी जाणून घेऊ शकता अनेक गुपिते…

ज्याप्रकारे ज्योतिष शास्त्रात कुंडली च्या आधारावर आणि अंकशास्त्र मध्ये मुल्यांकाच्या आधारावर व्यक्ती चे भविष्य, स्वभाव सांगितला जातो. त्याप्रमाणे सामुद्रिक शास्त्रात शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची रचना, आकार-प्रकार, रंग इ. च्या आधारावर भविष्य जाणून घेण्याचे प्रकार सांगितले आहेत. तसेच सामुद्रिक शास्त्र ची रचना समुद्र ऋषी ने केली होती, त्यामुळे त्याला समुद्र शास्त्र देखील म्हणले जाते. आज आपण भुवयांच्या रचनेवरून भाग्य आणि भविष्य कसे बघतात याबद्दल जाणून घेणार आहोत.

जोडलेल्या भुवया: ज्या लोकांच्या भुवया सोबत जोडलेल्या असतात, ते लोक खूप महत्त्वाकांक्षी आणि बुद्धिमान असतात. असे लोक थोडे स्वार्थी देखील असतात आणि कायम आपल्या सुधरण्यावर विचार करत असतात. या लोकांच्यात दुसऱ्यां कडून काम करून घेण्याची कमालीची योग्यता असते.

काळ्या रंगाच्या भुवया: ज्या लोकांच्या भुवया गडद काळ्या रंगाच्या असतात, ते खूपच हुशार आणि कला प्रिय असतात. असे लोक कलाच्या क्षेत्रात चांगली ओळख निर्माण करतात. या लोकांना महाग आणि चांगल्या वस्तू पसंत असतात. सोबतच ते आपल्या करिअर साठी गंभीर असतात.

फिकट काळ्या भुवया: ज्या लोकांच्या भुवया फिकट काळ्या रंगाच्या असतात आणि दाट नसतील त्यांच्या जीवनात काही खास महत्वाकांक्षा नसतात. ते एक सामान्य जीवन जगत असतात.

वाकड्या भुवया: ज्या लोकांच्या भुवया वाकड्या असतात. त्यांच्या जीवनात आर्थिक चढ उतार येत असतात. सामान्यतः त्यांची आर्थिक स्थिती खूप चांगली नसते. या लोकांना राग खूप लवकर येतो.

दाट भुवया असणारे लोक: ज्या लोकांच्या भुवया खूप दाट असतात. ते लोक पैसे वाचवण्यात खूप हुशार असतात. अशा लोकांचे आयुष्मान जास्त असते आणि बँक बेलेंस जास्त असतो. हे लोक आपल्या डोक्यात काय विचार चालू आहेत त्याबद्दल कोणालाही पत्ता लागू देत नाहीत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts