प्रसिध्द मराठी अभिनेत्री अमृता सुभाषने मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांमध्ये देखील अनेक महत्वाच्या भूमिका करून लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या सहज अभिनयाने दर्शकांचे मन जिंकणारी अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफविषयी देखील नेहमी उघडपणे बोलत असते.
नुकतेच अभिनेत्री अमृता सुभाषने गली बॉय चित्रपटामधील तिच्या भुमिकेबद्दल वक्तव्य केले आहे. एक विशिष्ट भूमिका साकारल्यानंतर बॉलिवूडमध्ये टाइपकास्ट होण्याबद्दल अमृताने खुलासा केला आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भुमिकेमध्ये असलेल्या गली बॉय चित्रपटामध्ये अमृताने रणवीरच्या आईची भूमिका केली होती.
विशेष म्हणजे अमृताला या चित्रपटामध्ये आईची भूमिका न करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याचे कारण सांगत अभिनेत्री म्हणाली कि जर अशी भूमिका केली तर कमी वयामध्येच बॉलीवूडमध्ये टाइपकास्ट होण्याचा धोका वाढतो. याबद्दल खुलासा करताना अभिनेत्री म्हणाली कि आता ओटीटीने आल्यामुळे हि भीती कमी झाली आहे. ओटीटीमुळे अनेक भूमिका करण्याची संधी मिळत आहे.
अभिनेत्री पुढे म्हणाली कि मी जेव्हा गली बॉय चित्रपटामध्ये रणवीरच्या आईची भूमिका केली होती तेव्हा सर्वजण म्हणाले होते कि तू हि भूमिका करू नकोस. कारण तुझ्या वयाला हि भूमिका योग्य वाटत नाही. यानंतर मला बार डान्सरची भूमिका करायला मिळाली.
गली बॉय चित्रपटामध्ये अमृताने रणवीरची आई रजिया अहमदची भूमिका केली होती. अमृता रणवीरपेक्षा फक्त ५-६ वर्षाने मोठी आहे. दरम्यान अमृताने एका मुलाखतीचा देखील उल्लेख केला. ती म्हणाली कि दीप्ती नवल यांना देखील नंतरच्या काळामध्ये असा सामना करावा लागला होता. दीप्तींना टाइपकास्ट व्हायचं नव्हतं आणि त्यांच्याकडे इतर कोणतेही पर्याय नसल्यामुळे, नंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणं जवळजवळ बंद केलं.
View this post on Instagram