HomeBollywoodबायका दिसल्या कि आऊट ऑफ कंट्रोल व्हायचा ‘हा’ अभिनेता, पाहताच लोक लपवायचे...

बायका दिसल्या कि आऊट ऑफ कंट्रोल व्हायचा ‘हा’ अभिनेता, पाहताच लोक लपवायचे त्यांच्या बायका…

बॉलीवूडच्या चित्रपटांतील भयानक खलनायक ज्याला फक्त पडद्यावरच नाही तर वास्तविक जीवनात देखील घाबरत होते, ते आपला ८७ वा जन्मदिवस साजरा करत आहेत. प्रेम चोपडा यांचा जन्म २३ सप्टेंबर १९३५ ला लाहौर, पाकिस्तान मध्ये झाला होता. कदाचित काही लोकांनाच माहिती असेल की प्रेम चोपडा नायक बनण्यासाठी बॉलीवूड मध्ये आलेले होते. परंतु नशिबाने त्यांना खलनायक बनवले ते पण असे की त्यांना पाहून लोक आपल्या पत्नीला लपवत असत. आता ते चित्रपटांपासून दूर आपल्या कुटुंबासमवेत आपल्या जीवनाचा आनंद घेत आहेत. तीन मुलींचे वडील असलेले प्रेम चोपडा यांचे कुटुंब आता नात नातींनी भरलेले आहे.

प्रेम चोपडा ने एका मुलाखतीत सांगितले होते की, लोक मला पाहताच आपल्या पत्नीला लपवत असत. परंतु मी त्यांच्या जवळ जात असे आणि त्यांच्या सोबत बोलत असे तेंव्हा त्यांना समजत असे की मी वास्तविक जीवनात वेगळा माणूस आहे. त्यांनी मुलाखतीत हे देखील सांगितले की माझे चित्रपट आणि माझी भूमिका पाहिल्यानंतर लोक मला वास्तविक जीवनात देखील एक भयानक खलनायक समजू लागले होते, परंतु मी या गोष्टींना प्रशंसा समजत होतो आणि हे सर्व पाहून मला असे वाटायचे की मी भूमिका चांगल्या प्रकारे करत आहे.

प्रेम चोपडा यांनी आपल्या ६० वर्षांच्या करिअर मध्ये ३८० चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील जास्तीत जास्त चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका केली आहे. चित्रपटांमध्ये येण्याआधी जेव्हा ते पंजाब युनिवर्सिटी मध्ये शिक्षण घेत होते त्यावेळी ते नाटकांमध्ये देखील काम करत होते आणि तिथूनच त्यांना अभिनय करण्याची आवड निर्माण झाली.

जेव्हा ते बॉलीवूड मध्ये नशीब अजमावण्यासाठी मुंबई मध्ये आले होते त्यावेळी त्यांच्या आई चे कैन्सर मुळे निधन झाले. त्यावेळी त्यांची बहिण ९ वर्षांची होती. त्यामुळे त्यांनी आपल्या बहिणीला मुलगी मानले आणि तिचे पालनपोषण केले. त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअर ची सुरुवात पंजाबी आणि बॉलीवूड मधील काही चित्रपटांमधून हिरोच्या भूमिकेमधून केली. परंतु हिरो म्हणून त्यांचा कोणताही चित्रपट चालला नाही. नंतर त्यांना खलानायकाच्या भूमिका येवू लागल्या आणि त्यांनी त्या स्वीकार करणे योग्य समजले.

चित्रपटात खलनायकाची भूमिका करताच प्रेम चोपडा प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी बॉबी, अंजाना, वारीस, पगला कही का, कटी पतंग, राजा जानी, अजनबी, ड्रीम गर्ल, त्रिशूल, कला पत्थर, दोस्ताना, लुटमार, अंधा कानून, फुल बने अंगारे, राजा बाबू, एजेंट विनोद सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की प्रेम चोपडा बॉलीवूड चे शोमैन राज कपूर यांचे साडू भाऊ आहेत. प्रत्यक्षात दोघांच्या पत्नी या सख्ख्या बहिणी आहेत. तथापि,आता नाही तर राज कपूर आहेत आणि त्यांची पत्नी कृष्णा राज. दोघेही जग सोडून गेले आहेत.

प्रेम चोपडा आणि उमा चोपडा यांच्या तीन मुली आहेत प्रेरणा चोपडा, पुनीत चोपडा, रकीता चोपडा. त्यांचे जावई आहेत राहुल नंदा, विकास भल्ला आणि शरमन जोशी. तसेच त्यांचे ६ नातू नाती आहेत. रकिता आणि राहुल नंदा यांना एक मुलगी आहे, तिचे नाव रीशा आहे. पुनीता आणि विकास भल्ला यांना एक मुलगी सांची आणि एक मुलगा वीर आहे. प्रेरणा आणि शरमन जोशी यांना मुलगी ख्याना आणि जुळी मुले विहान आणि वर्यान आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts