शाहरुख खान च्या नंतर काजोल ने देखील मनोरंजन इंडस्ट्री मध्ये ३० वर्ष पूर्ण केले आहेत. या खास निमित्ताने काजोल संबंधित अनेक बातम्या वाचायला मिळत आहेत. एका मुलाखतीदरम्यान काजोल ने लवकरच ओटीटी वर सुरुवात करण्याबद्दल देखील खुलासा केला आहे. तथापि, ती कोणत्या सिरीज मध्ये दिसणार आहे त्याबद्दल तिने अजून काही शेअर केले नाही.
पिंकविला ला दिलेल्या मुलाखतीमध्ये काजोल ने ओटीटी च्या महत्वावर मोकळेपणाने बोलले आहे. काजोल सांगते कि ९० च्या दशकामध्ये थिएटर मनोरंजनाचे एकमेव साधन होते, ज्यामुळे चित्रपटांना बॉक्स ऑफिस वर यश मिळवणे सोपे झाले होते. तसेच आता ओटीटी प्लेट्फोर्म मुळे कलाकारांना त्यांची क्षमता आणि प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली.
ओटीटी वर पुढे सांगताना काजोल म्हणते कि सर्वत्र अभिनेत्यांसाठी सध्या चांगली वेळ आहे. त्यांना खूप एक्सपोजर मिळत आहे. प्रत्येकाजवळ काम आहे. काजोल चे म्हणणे आहे कि ओटीटी ने काही उत्तम कलाकार आणले आहेत. या सर्व कलाकारांनी हे सध्या करून दिले आहे कि ते काय करण्यात सक्षम आहेत.
काजोल म्हणते कि कोणाजवळ २४ इंचाची कंबर आहे आणि ३६ अथवा ४६ इंच ची छाती असो अथवा नसो, परंतु तो स्वतः च एक स्टार बनला आहे. तसेतर काजोल ने बरोबर सांगितले आहे. ओटीटी प्लेट्फोर्म ने फक्त अनेक कलाकारांना काम दिले आहे, उलट अनेक लोक आहेत ज्यांची नवीन ओळख निर्माण केली आहे.
येत्या काळात अशा अनेक कलाकारांचे अभिनय कौशल्य आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. याशिवाय काजोल च्या पदार्पणाची अजूनही प्रतीक्षा आहे. असे सांगितले जाते कि काजोल ‘लव स्टोरी २’ मधून ओटीटी वर पदार्पण करू शकते. आता पाहूया हि फक्त अफवा आहे कि वस्तुस्थिती.