बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये होती. ती युवा नेता राघव चड्ढाला डेट करत होती. दोघांनी याबद्दल कोणतेही कन्फर्मेशन दिले नव्हते. नुकतेच आता दोघांनी एंगेजमेंट केली आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहेत.
एक नवीन व्हिडीओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये राघव चड्ढा आपल्या होणाऱ्या पत्नीला कीस करताना दिसत आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राचा हा रोमँटिक खाजगी व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाच्या ज्या व्हिडीओबद्दल आणि बोलत आहोत त्यामध्ये अभिनेत्री आपल्या होणाऱ्या पतीच्या हातामध्ये हात घालून उभी आहे. दोघे आपल्या ऑर्डिनेटेड एंगेजमेंट आउटफिट्समध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. एंगेजमेंटच्या या व्हिडीओमध्ये अचानक राघव परिणीतीच्या गालावर कीस करतो.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि बॅकग्राउंडमध्ये परिणीती चोप्राचा चित्रपट केसरीमधील ‘वे माही’ गाणे वाजत आहे जे परिणीती देखील गाताना दिसत हे. असे वाटत आहे कि तिने हे गाणे राघव चड्ढाला डेडीकेट केले आहे. परिणीती जेव्हा गाणे म्हणत आहे तेव्हा राघव तिच्या गालावर कीस करतो. या फ्रेम्समध्ये परिणीती चोप्राचे वडील देखील उभे आहेत जे आपल्या मुलीला आणि होणाऱ्या जावयाकडे पाहत आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram