उर्फी जावेद मुंबईमध्ये परतली आहे. ती प्रोजेक्टच्या शूटसाठी सौदी अरेबिया आणि अजरबैजानला गेली होती. तिने आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ तेथून शेयर केले. मुंबईला परत आल्यानंतर उर्फीला विमानतळावर पापाराझींनी स्पॉट केले. आपल्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी उर्फी विमानतळावर पापाराझींसाठी पोज देताना पाहायला मिळाली होती.
यादरम्यान उर्फीने पिंक कलरचा आउटफिट कॅरी केला होता. तिने ब्रालेटसोबत मॅचिंग पॅन्ट घातली होती. त्यावर तिने रेड कलरचे लाँग जॅकेट कॅरी केले होते. त्याचबरोबर तिने ओवरसाइज्ड सनग्लासेस आणि पिंक हाय हील्स देखील कॅरी केले होते.
उर्फीबद्दल नुकतेच काही दिवसांपूर्वी एक अफवा आली होती कि तिला दुबईमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पण उर्फीने स्पष्ट केले कि शुटींगच्या वेळेसाठी समस्या होती म्हणून पोलीस आले होते. जेव्हा उर्फी विमानतळावर पोहोचली तेव्हा पापाराझींनी तिच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
तिने स्पष्ट सांगितले कि मला जे सांगायचे होते ते मी आधीच सांगितले आहे. उर्फीच्या आईने फूड रेसिपीचे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. यावर एका पापाराझीने तिला विचारला कि आंटी जीच्या हातचे खायला केव्हा मिळेल?’ उर्फी म्हणाली, ‘लखनऊला या.’
यादरम्यान एकाने उर्फीला म्हंटले कि मला तुमच्या हातचे खायचे आहे. तेव्हा उर्फी म्हणाली कि का मी काय तुझी बायको आहे का ? मी का खाऊ घालू ? तुझ्या बायको किंवा गर्लफ्रेंडच्या हातचे खा. उर्फीने नुकतेच एक व्हिडीओ शेयर केला होता ज्यामध्ये ती कोल्ड ड्रिंकच्या कॅनच्या झाकणाने बनवलेला ड्रेस घातलेली दिसली होती. तिने ब्रालेटवर कॅनच्या झाकणाने बनलेला टॉप सारखे बनवले.
View this post on Instagram