HomeBollywoodप्रसिद्ध गायकावर कोसळला दुःखाचा डोंगर, पत्नीचे नि'धन, दोन दिवसांनंतर होणार होते मुलाचे...

प्रसिद्ध गायकावर कोसळला दुःखाचा डोंगर, पत्नीचे नि’धन, दोन दिवसांनंतर होणार होते मुलाचे लग्न…

प्रसिद्ध पंजाबी सिंगर नछत्तर गिलची पत्नी दलविंदर कौरचे १५ नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे. सिंगरच्या पत्नीने ४८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. नछत्तरची पती गेल्या अनेक दिवसांपासून कँसरने पिडीत होती. सर्व उपचार आणि प्रयत्न करून देखील अखेर दलविंदर हि आयुष्याची लढाई जिंकू शकली नाही.

सिंगरच्या घरामध्ये आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते कारण दोन दिवसांनी त्याच्या मुलाचे लग्न होते. आता घरामध्ये शोककळा पसरली आहे. नछत्तरने आपली पत्नी तर मुलाने आपल्या आईला गमवले आहे.

नुकतेच १४ नोव्हेंबर रोजी त्याची मुलगी सरप्रीत कौरचे देखील लग्न झाले होते. कदाचित घरामध्ये सर्वांनाच हा अंदाज लागला होता कि आता दलविंदर कौर जवळ जास्त वेळ नाही. यामुळे त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची मुले लग्न करू इच्छित होते. आज म्हणजेच बुधवारी बंगा रोड फगवाड़ा स्थित श्मशानभूमीत त्यांच्या अंत्यसंस्कार होणार आहेत, ज्यानंतर दलविंदर पंचतत्वामध्ये विलीन होतील.

नछत्तर गिल च्या पत्नीच्या निधनानंतर संपूर्ण इंडस्ट्री शोकमध्ये आहे. पंजाबी सिंगर नछत्तर गिल आपल्या साहिब जिनाह दिया माने आणि अरदास करा गया या गाण्यांसाठी ओळखला जातो. तो एक सिंगर तर आहेच त्याचबरोबर त्यांने पंजाबी चित्रपटांमध्ये काम देखील केले आहे. तो कबड्डी वंस अगेन आणि गल सुन हो गया सारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला होता. यासोबत नछत्तरला दिल दित्ता नहीं सी गाण्यामुळे खूपच प्रसिद्धी मिळाली. सध्या सिंगर खूपच कठीण काळामधून जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts