HomeEntertainmentचित्रपटसृष्टीत शोककळा ! प्रसिद्ध अभिनेत्रीचे दुःखद निधन, अनेक दिवसांपासून होती आजारी...

चित्रपटसृष्टीत शोककळा ! प्रसिद्ध अभिनेत्रीचे दुःखद निधन, अनेक दिवसांपासून होती आजारी…

पंजाबची प्रसिद्ध अभिनेरी दलजीत कौर गुरुवारी चार वाजता निधन झाले आहे. दलजीत कौरने एके काळी पंजाबी फिल्म इंडस्ट्रीवर राज्य केले होते. तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ६९ वर्षाची दलजीत कौर गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. तिचे अंतिम संकर नई आबादी अकालगढ़ येथील स्मशानभूमीत करण्यात आले.

दलजीत कौरने १० पेक्षा जास्त हिंदी आणि ७० पेक्षा अधिक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले होते. दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवीधर असलेली दलजीत कौरने पुणे फिल्म इंस्टीट्यूटमधून आपल्या अभिनय करियरची सुरुवात केली होती. १९७६ मध्ये तिचा पहिला चित्रपट दाज रिलीज झाला होता.

तिने पुत्त जट्टां दे, मामला गड़बड़ है, की बणु दुनिया दा, सरपंच आणि पटोला सारख्या सुपरहिट पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे पती हरमिंदर सिंह देओल यांची रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले होते. तिला मूलबाळ नव्हते. २००१ मध्ये पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता आणि वयानुसार ती आई आणि इतर भूमिकांमध्ये दिसली होती. तिने सिंह वर्सेस कौर पंजाबी चित्रपटामध्ये गिप्पी ग्रेवालच्या आईची भूमिका केली होती.

दलजीत कौर कबड्डी आणि हॉकीची नॅशनल खेळाडू राहिली आहे. ती गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होती. यामुळे ती मुंबईहून लुधियाना येऊन कस्बा गुरुसर सुधार बाजारमध्ये आपल्या एका नातेवाईकाच्या घरामध्ये राहू लगली होती. तिला आपल्या भूतकाळातील आयुष्याबद्दल काहीच आठवत नव्हते. शेवटच्या दिवसांत तिला खूप शारीरिक त्रास सहन करावा लागला आणि गुरुवारी त्यांचे निधन झाले.

दलजीत कौरचे कुटुंब मुळचे लुधियाना जिल्ह्यातील एटियाना गावचे रहिवासी होते, परंतु त्यांचा व्यवसाय पश्चिम बंगालमध्ये होता. दलजीत कौरचा जन्म १९५३ मध्ये सिलीगुडी येथे झाला. ती गेल्या १२ वर्षांपासून कसबा गुरुसर सुधार बाजार येथे चुलत भाऊ हरजिंदर सिंग खानगुडा याच्याकडे राहत होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts