अरमीना राणा खान पाकिस्तान मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. यावेळी अरमीना तिच्या गरोदर पणातील वेळ मजेत घालवत आहे. अलीकडे अभिनेत्री ने बेबी बंप करतानाचे फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले होते. ज्याच्या मुळे युजर्स कडून तिला खूपच बरे वाईट ऐकायला मिळाले होते. लोकांनी तिच्या फोटो शूट ला धर्माच्या विरुद्ध सांगितले आहे. परंतु अरमीना यासगळ्या गोष्टींना घाबरत नाही, तिने ट्रोल करणाऱ्या युजर्स ला उत्तर दिले आहे.
अरमीना गर्भधारणेच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये आहे. अभिनेत्रीने तिच्या पतीसोबत पोज देतानाचे फोटो शेअर केले होते. जिथे तिने तिचे बेबी बम्प दाखवले आहेत. तथापि अरमीना ग्रे – पर्पल रंगाच्या सैटीन ड्रेस मध्ये खूपच सुंदर दिसत होती. परंतु काही युजर्स ना हे आवडले नाही. त्यांनी अभिनेत्री ला खूपच वाईट कमेंट करत, टोला लगावला. अरमीना ला हॉलीवूड ची कॉपी म्हंटले गेले. तसेच एक युजर म्हणाला की – ही खूपच दुर्दैवाची गोष्ट आहे की महिलांना ताकतवर समजण्यासाठी ‘कुफर’ ला पाळावे लागते.
या द्वेषपूर्ण संदेश आणि टिप्पणी ना प्रतिसाद म्हणून अरमीना ने अनेक विधाने लिहून एक स्टोरी पोस्ट केली आहे. अभिनेत्री ने समर्पक उत्तर दिले आणि म्हणाली – जेवढे लोक चिढत आहेत, मी खरे सांगत आहे की, मी तर खूप जोरात हसत आहे, बिचारे सकाळ पासून उड्या मारत आहेत. कारण की अनेक युजर्स नि अभिनेत्रीला माकड देखील म्हंटले होते त्यामुळे अरमीना ने स्टोरी मध्ये माकड आणि माकडीण चा हैशटैग दिला. अरमीना ने एका युजर च्या मेसेज चा स्क्रीनशॉट पाठवत स्टोरी मध्ये लिहिले की – लेडीज आणि जेंटलमेन, हे कोणते विमानतळ नाही, त्यामुळे हे महत्वाचे नाही की तुम्ही तुमच्या येण्या जाण्याची माहिती द्यावी. धन्यवाद.
अरमीना ने एका युजर साठी सकारात्मक प्रतिक्रिया देखील शेअर केली आहे. या स्क्रीनशॉट मध्ये लिहिले होते की – मी कायमच तुमचा प्रशंसक राहिलेलो आहे. तुम्ही ही आनंदाची बातमी आमच्या सोबत शेअर केली, त्या द्वेष करणाऱ्यांसोबत नाही. आणि आम्ही यासाठी सन्मानित आहोत. त्याला उत्तर देताना अरमीना ने लिहिले – खरे सांगायचे तर, माझ्या जवळ खऱ्या प्रेम व्यतिरिक्त काही नाही. हे ट्रोलर्स त्यांच्या खोट्या अकाऊंट वरून कमेंट करतात. परंतु माझे लक्ष कायम माझ्या शुभचिंतकांवर असते.
अरमीना ने स्टोरी अपडेट करत लिहिले आहे की – पुढील वेळी मी माझ्या प्रसूती बद्दल बोलेन, सगळी माहिती सांगेन, केव्हा, कुठून झाले. कारण हा माझा जागा आहे तुमचा नाही. जर आता पर्यंत तुमच्या धर्मासोबत जोडलेले मुद्दे पाहिले नसतील तर त्या बद्दल विचार करा. अरमीना ने सांगितले की लाजेचे आणि धर्माचा कोणताही संबंध नाही, परंतु काही लोक काही कारण नसताना मुद्दा बनवत असतात.
अरमीना ने दुसऱ्या एका युजर ची कमेंट शेअर करताना लिहिले की – बॉस एक गोष्ट सांगा, जेव्हा रस्त्यावर तुम्हाला गरोदर महिला दिसते तेंव्हा काय घोड्याचे ब्लाइंडर्स घालतात काय. नाहीतर नजर दुसरीकडे वळवता. मला तर शंका आहे काही नाही करत असाल. जेव्हा विचारच एवढे घाणेरडे असतील तर नजर देखील घाणेरडी असणार.
अरमीना ने प्रत्येक स्त्री ला पुढे ऐऊन आपले मत मोकळे पणाने मांडण्याचा सल्ला दिला. अरमीना म्हणाली की ती त्या प्रत्येक स्त्री च्या सोबत आहे जी गरोदरपणावर मोकळे पणाने आपले मत मांडते. २१ व्या शतकात देखील महिलांना त्यांच्या शरीराबद्दल लाज वाटली पाहिजे. यापेक्षा वाईट काही नाही.