तसे तर हुंडा देणे आणि घेणे चुकीचे आहे. हुंडा एक सामाजिक दुष्ट मानले जाते. हुंड्याविरोधात सरकारही मोठ मोठे कार्यक्रम राबवतात असते. बॉलीवूड पासून प्रादेशिक चित्रपटांपर्यंत हुंड्याविरोधात अनेक चित्रपट देखील बनवले गेले आहेत.
असे असून देखील काही लोकांना आपल्या मुलीच्या लग्नामध्ये हुंडा द्यावा लागतो. अनेक वडील तर आपल्या मुलीचा लग्नामध्ये आनंदाने देखील हुंडा देतात, तर अनेकवेळा तर मुलाकडच्या दबावामुळे हुंडा द्यावा लागतो. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत.
व्हिडीओमधील नजारा कदाचित तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. व्हिडीओमध्ये पाहू शकता कि नवरदेवाला लग्नामध्ये इतका हुंडा मिळाला आहे ज्याची तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही. व्हिडीओ मध्ये पाहू शकता कि नवरदेव मंडपामध्ये बसला आहे. त्याच्या गळ्यामध्ये नोटांची माळ आहे. तर त्यांच्या आसपास हुंड्याचे समान दिसत आहे. नवरदेवाला कार देखील मिळाली आहे त्याचबरोबर घर-गृहस्थीचे सामन देखील मिळाले आहे.
व्हिडीओमध्ये पाहू शकता कि नवरदेवाला भरपूर भांडी मिळाली आहेत. याशिवाय, सोफा, फ्रीज, एसी, कुलर, पंख सर्वकाही मिळाले आहे. इतकेच नाही तर अनेक समान दोनदोन तीनतीन वेळा मिळाले आहे. याशिवाय दागिने देखील भरपूर मिळाले आहेत. हा व्हिडीओ graduatememeswala नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे जो सध्या खूपच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram