HomeBollywoodपोरीनं चारचौघात काढली लाज, न्यासाने सर्वांसमोर आई काजोलसोबत केलं असं काही...व्हिडीओ व्हायरल...

पोरीनं चारचौघात काढली लाज, न्यासाने सर्वांसमोर आई काजोलसोबत केलं असं काही…व्हिडीओ व्हायरल…

अजय देवगन आणि काजोलची मुलगी प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वीच ती खूपच चर्चेमध्ये राहू लागली आहे. न्यासा सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय राहते. ती अनेक पार्ट्यांमध्ये, फंक्शनमध्ये हजेरी लावताना पाहायला मिळत असते.

न्यासा देवगन कधी कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या वागणुकीमुळे नेहमी ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत असते. नुकतेच पुन्हा एकदा ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली जेव्हा ती तिच्या आईसोबत नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या वेळी स्पॉट झाली. यादरम्यान तिच्या वागणुकीमुळे नेटकरी तिच्यावर नाराज झाले.

गेले अनेक दिवस नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची सर्वत्रच चर्चा होती. नुकतेच या सेंटरचा उद्घाटन सोहळा पार पडला. ज्यामध्ये देशविदेशातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या फंक्शनमध्ये काजोल आणि तिची मुलगी न्यासाने देखील हजेरी लावला. दरम्यान दोघींचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे.

काजोल आणि न्यासा ज्यावेळी फंक्शनमध्ये पोहोचल्या त्यावेळी दोघी माय लेकींनी पापाराझींसमोर पोज दिल्या. ज्यानंतर त्या तिथून निघू लागल्या, दरम्यान फोटोग्राफर्सनी न्यासाकडे सोलो फोटोची मागणी केली, काजोलने देखील न्यासाला सोलो फोटो देण्यास सांगितले पण ती कोणाचेही न ऐकता तिथून निघून गेली.

न्यासाने काजोलचे म्हणणे न ऐकल्यामुळे नेटकरी तिच्यावर नाराज झाले. एकाने लिहिले आहे कि हि नेहमी तिच्या आईला मान खाली घालायला लावते. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि आजच्या पिढीला पालकांसोबत फोटो काढण्यात जरादेखील इंटरेस्ट नसतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts