HomeBollywoodसंन्यासी बनण्यापूर्वी पतीसोबत ‘हे’ काम करत होती नुपूर अलंकार, दीड वर्षे पतीसोबत...

संन्यासी बनण्यापूर्वी पतीसोबत ‘हे’ काम करत होती नुपूर अलंकार, दीड वर्षे पतीसोबत…

प्रसिद्ध टीवी अभिनेत्री नुपूर अलंकार च्या चाहत्यांना या वर्षी तेंव्हा झटका लागला जेव्हा तिने या इंडस्ट्री ला सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. तेंव्हा नुपूर अलंकार ने म्हंटले होते की तिचे पती अलंकार श्रीवास्तव ने तिला लग्नाच्या बंधनातून मुक्त केले आहे. आता नुपूर अलंकारच्या विवाहिक जीवनाबद्दल एक नवीन गुपित समोर आले आहे. बातमीनुसार नुपूर आणि तिचा पती ३ वर्षांपूर्वी वेगळे झाले आहेत.

इटाइम्स टीवी च्या रिपोर्ट नुसार, नुपूर आणि तिचा पती मागील ३ वर्षापासून एकत्र राहात नाहीत. एवढेच नाही तर मागील अडीच वर्ष झाले दोघे वेगवेगळे राहत आहेत. सूत्रांनुसार, नुपूर आणि तिचा पती यांच्यातील प्रेम, कनेक्शन आणि सर्वकाही संपुष्टात आलेले आहे. त्यांच्या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारची जवळीकता राहिलेली नाही. त्यांच्या दोघांच्यात कोणत्याही प्रकारचे शारीरिक आकर्षण राहिलेले नाही. दोघांनी नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न देखील केला होता, पण त्यात यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचे चांगले समजले आणि हळूहळू आपले विवाहित संबंध संपुष्टात आणले.

आपल्या एका जुन्या मुलाखतीत नुपूर अलंकार ने सन्यास घेण्याच्या निर्णयावर लोकांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया यावर सांगितले होते. नुपूर अलंकार ने सांगितले होते, माहित नाही लोक काय विचार करतात की मी भावनिकदृष्ट्या तुटलेली आहे आणि जीवनाला खूप त्रासलेली आहे तेंव्हा मी हा निर्णय घेतला आहे पण असे काही नाही. नुपूर अलंकार ने शोबीज इंडस्ट्री मध्ये खूप कालावधी घालवल्यानंतर सन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता.

इंडस्ट्री मध्ये २७ वर्ष काम केल्या नंतर नुपूर अलंकार ने हा मोठा निर्णय घेतला. अभिनेत्रीच्या या निर्णयाने खळबळ उडाली होती. नुपूर अलंकार ने याच वर्षी फेब्रुवारी मध्ये सन्यास घेतला होता आणि ऑगस्ट मध्ये लोकांना या निर्णयाबद्दल समजले. सन्यास घेतल्यानंतर नुपूर अलंकार ला भगव्या कपड्यांमध्ये आणि रुद्राक्ष च्या माळां घातलेल्या पाहू शकता. आता नुपूर वेगवेगळ्या तीर्थक्षेत्र ला जाते आणि गरजवंत लोकांना मदत करते.

नुपूर अलंकार ने बऱ्याच टीवी मालिकांमध्ये काम केले आहे. तिला शक्तिमान, घर की लक्ष्मी बेटीया, दिया और बाती हम, राजा जी सारख्या मालिकांमध्ये पाहिले आहे. नुपूर अलंकार ने चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ती सोनाली केबल, सावरिया सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. नुपूर अलंकार इंस्टाग्राम वर आपले नवनवीन फोटो आणि विडीओ शेअर करत असते आणि आध्यात्मिक प्रवासाला चाहत्यांसोबत शेअर करत असते.

२००२ मध्ये नुपूर अलंकार चा विवाह झाला होता. माहिती नुसार तिच्या पती ने नुपूर ला संन्यास घेण्याच्या निर्णयावर होकार दिला होता. सासू सासऱ्यांनी देखील संमती दिली होती. २०२० मध्ये नुपूर अलंकार च्या आई चे निधन झाले आता तिला कोणालाही गमावण्याची भीती नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts