नोरा फतेहीचा योगायोग म्हणा कि ती जेवढ्या देखील म्युजिक विडीओ मध्ये दिसली आहे, बहुतेक विडीओज मध्ये तिचा अवतार ‘बेवफा गर्लफ्रेंड’ चा आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकांमध्ये प्रतिमा निर्माण होत असल्याने नोरा स्वतः नाराज आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘अच्छा सिलाह दिया’ या गाण्यामध्ये नोरा हि अशीच एक पत्नी बनली आहे, जी तिच्या जोडीदाराचा खून करते.
जेव्हा नोरा पासून जाणून घेण्याचा प्रयत्न केला कि खऱ्या आयुष्यात देखील तिने कोणाला धोका दिला आहे काय. याला उत्तर देताना नोरा म्हणते कि, मी खऱ्या आयुष्यात अजिबात फसवणूक करणारी मुलगी नाही. हे विचित्र आहे कि मी गायलेली सर्व सर्व एकेरी गाणे त्यामध्ये तशीच मुलगी बनलेली आहे, जी धोका देते आणि मुलांना एकटे सोडून देते. राहिली गोष्ट माझ्या आयुष्याची, याच्या उलट माझी अनेकवेळा फसवणूक झाली आहे. देवाची आभारी आहे कि मला अजून कोणीही असे बरबाद केले नाही, जसे गाण्यामध्ये दाखवण्यात आले आहे.
रोमेंटिक गाण्यात दिसणारी नोरा सध्या तरी सिंगल आहे. नोरा तिच्या भावी जोडीदारात कोणते गुण शोधते. या प्रश्नांच्या उत्तराला नोरा म्हणते कि, हा अतिशय मनोरंजक प्रश्न आहे. तसे, मला माझा भावी जोडीदार प्रामाणिक आणि मेहनती हवा आहे आणि सर्वात महत्वाचे मला प्रेम करणारा पाहिजे.
क्वीन ऑफ सिंगल्स गाण्यांच्या टेगवर प्रतिक्रिया देताना नोरा म्हणते, मी जे देखील सिंगल्स केले आहेत, त्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त बाकी लोकांची मेहनत आहे. एक पूर्ण टिम यावर काम करत असते. मी आनंदी आहे कि लोकांना माझे गाणे आवडतात. तसे तर मला अल्बमबद्दल असे वाटते कि मला यामध्ये अभिनयासोबत नृत्याची संधीही मिळते. एक कलाकार म्हणून मला ते आव्हान देतात. भविष्यात हि चाहत्यांनी माझ्या गाण्यावर असाच प्रेमाचा वर्षाव करावा हीच माझी इच्छा आहे.
मागील काही दिवसांपूर्वी नोरा फतेही चे अच्छा सिला दिया गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये नोरा च्या सोबत राजकुमार राव म्युजिक अल्बम मध्ये सुरुवात करत आहे. गाण्याला बी प्राक ने गायले आहे आणि गाणे जानी ने लिहिले आहे.
View this post on Instagram