HomeBollywood"तसं असतं तर मग माझा हात..." नोराला चुकीच्या प्रकारे स्पर्श केल्यानंतर टेरेन्स...

“तसं असतं तर मग माझा हात…” नोराला चुकीच्या प्रकारे स्पर्श केल्यानंतर टेरेन्स लुईसने दिली प्रतिक्रिया…

कोरियोग्राफर टेरेन्स लुईसने नोरा फतेहीला चुकीच्या प्रकारे स्पर्श केला होता. काही वर्षापूर्वी यावर खूपच वाद झाला होता. वास्तविक रियालिटी शो इंडियाज बेस्ट डांसरच्या सेटवरून नोरा आणि टेरेन्सचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्याला पाहिल्यानंतर लोकांनी दावा केला होता कि टेरेन्सने नोराला चुकीच्या प्रकारे स्पर्श केला होता. आता टेरेन्स लुईसने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

टेरेन्स लुईसने मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये आपल्यावर लावलेल्या आरोपांना चुकीचे सांगितले आहे. टेरेन्स लुईसने आपल्या स्पष्टीकरणामध्ये म्हंटले आहे कि ती एक खूपच सिंपल सिचुएशन होती. शोमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी आले होते. गीता कपूरला वाटले कि आम्ही त्यांना चांगले वेलकम करावे. त्यावेळी शोची जज मलायका अरोराला को वि ड झाला होता. अशामध्ये मलायकाच्या जागी नोरा फतेही शोमध्ये आली होती.

टेरेन्स म्हणाला कि गीताच्या गोष्टीवर मी देखील म्हंटले होते कि ठीक आहे आपण त्यांना फुल नमस्कारसोबत ग्रीट करूया. आम्ही दोघांना आदरपूर्वक अभिवादन केले. पण गीताला वाटले तितके पुरेसे नाही. आम्हाला काहीतरी करावे लागेल. तेव्हा मी गीताचे ऐकले. मला आठवत नाही कि माझा हात नोराला टच देखील झाला होता कि नव्हता.

टेरेन्स पुढे म्हणाला कि माझ्या आजूबाजूला कॅमेरे असताना मी एखाद्याला चुकीच्या प्रकारे कसे स्पर्श करेन. हे खूपच चीप आहे. तुम्ही असे करू शकत नाही. मला मेसेजमध्ये शि वी गाळ करण्यात आली. मी नोरासोबत शोमध्ये याआधी देखील क्लोज डांस केला होता आणि जेव्हा एखाद्या परफॉर्मेंसमध्ये असतात तेव्हा तुम्ही झोनमध्ये जाऊन विचार करत नाही. अशाप्रकारची हरकत करण्यासाठी खूपच गट्स पाहिजेत.

टेरेन्स लुईसचा जेव्हा नोरा फतेहीसोबत व्हिडीओ व्हायरल झाला होता तेव्हा देखील त्याने स्वतःला डिफेंड करत निर्दोश म्हंटले होते. टेरेन्सचे म्हणणे होते कि व्हिडिओसोबत छेडछाड करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा टेरेन्सनेने स्पष्ट केले आहे कि त्याने नोराला चुकीच्या प्रकारे स्पर्श केला नव्हता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts