HomeBollywoodटीव्हीच्या श्रीकृष्णाने १२ वर्षानंतर तोडले आपले विवाह बंधन, पत्नीपासून वेगळे होण्यावर म्हंटले;...

टीव्हीच्या श्रीकृष्णाने १२ वर्षानंतर तोडले आपले विवाह बंधन, पत्नीपासून वेगळे होण्यावर म्हंटले; मी नशीबवान…

एका काळातील सर्वोत्तम टीवी मालिका ‘महाभारत’ ला सर्वजण जाणतात. ही मालिका इतकी प्रसिद्ध आहे की चाहते आज पण त्या शो ला पसंद करतात. या शो ची लोकप्रियता आज देखील तेवढीच आहे, जेव्हढी त्यावेळी असायची ज्यावेळी हा शो चालू झाला होता.

या मालिकेमधील खूप साऱ्या कलाकारांना या मालिकेमुळेच प्रसिद्धी मिळाली आहे. ज्यामधील एक आहेत अभिनेता नीतीश भारद्वाज. महाभारत फेम अभिनेता नीतीश भारद्वाज ने ‘महाभारत’ मालिकेमध्ये भगवान श्रीकृष्ण ची भूमिका केली होती. ज्याला चाहत्यांनी खूप पसंद केले होते.

अभिनेता नीतीश भारद्वाज सध्यातरी आपल्या वैयक्तिक जीवनात व्यस्त आहेत. अभिनेत्याला शेवटचे ‘समांतर-२’ मध्ये पाहायला मिळाले. ज्यात त्याने सुदर्शन चक्रपाणी ची भूमिका केली होती. याला चाहत्यांनी खूप पसंद केले आहे. समांतर-२ ही मालिका एक मराठी भाषेतील वेब सिरीज आहे.

तसेच अभिनेता नीतीश भारद्वाज आपल्या पर्सनल लाइफ मध्ये एकटेच असतात आणि घरी देखील एकटेच राहतात. असे यामुळे की २०१९ मध्ये त्यांनी आपल्या पत्नी सोबत वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि वेगळे झाले आहेत. त्याच्या पत्नीचे नाव स्मिता होते. दोघांना दोन जुळ्या मुलीदेखील आहेत.

प्रत्यक्षात अभिनेत्यासोबत वेगळे झाल्यानंतर त्याची पत्नी दोन्ही मुलींना घेऊन इंदौर ला रहाते. सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेता नीतीश भारद्वाज ची पत्नी स्मिता एक आईएएस अधिकारी आहेत. दोघे १२ वर्ष एकत्र राहून वेगळे झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts