नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न लवकरच होणार आहे. अनंत अंबानी ची आई नीता अंबानी कायम त्यांच्या स्टाईल आणि फैशनमुळे चर्चेत येत असते. मुलाचे लग्न करत असलेली नीता अंबानी स्वतः जेव्हा ३८ वर्षांपूर्वी वधु बनली होती तेव्हा त्या प्रकाशासारख्या चमकत होत्या.असे आम्ही नाही तर त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून तुम्ही देखील म्हणू शकता.
नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या प्रेमाची गोष्ट कोणत्या चित्रपटापेक्षा कमी नाही. ३८ वर्षांपूर्वी अंबानी कुटुंबाची सून बनलेली नीता लहानपणापासून शास्त्रीय नृत्याची आवड आहे.
तिच्या आई ला नेहमी वाटत असे कि त्यांच्या मुलीने चार्टर्ड अकौंटंट बनावे. नीता अंबानी यांनी मात्र आपले करिअर अध्यापन आणि इंटिरियर डिझाईनींग मध्ये करण्याचे ठरवले.
शास्त्रीय नृत्य ची आवड असणारी नीता अंबानी ने एकदा नवरात्रीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. जिथे धीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेन देखील आले होते, कार्यक्रमात नीता यांना नृत्य करताना पाहून धीरूभाई आणि कोकिलाबेन प्रभावित झाले. नीता यांची माहिती काढल्यानंतर नीता नीता यांच्या घरी धीरूभाई यांनी फोन केला.
एका मुलाखतीत असे सांगितले गेले होते कि तो फोन देखील नीता यांनीच उचलला होता. फोन वर दुसरीकडे धीरूभाई अंबानी आहेत, हे ऐकून नीता यांना विश्वास बसला नाही आणि त्यांनी चुकीचा नंबर म्हणून फोन ठेवून दिला. असे त्यांनी एकदा नाही तर दोन वेळा केले. तिसऱ्यांदा जेव्हा फोन आला तेव्हा त्यांना पटले.
मुकेश अंबानी ने नीता यांना अतिशय विलक्षण शैलीन प्रपोज केले होते. मुकेश आणि नीता कार मध्ये बाहेर फिरायला गेले होते. तेव्हा एका सिग्नल वर गाडी थांबली, तिथे मुकेश ने नीता यांना विचारले कि, काय ती त्याच्या सोबत लग्न करेल. तेव्हा सिग्नल हिरवा झाला आणि मागील सर्व गाड्या हॉर्न वाजवू लागल्या, नीता यांनी गाडी चालू करण्यास सांगितले, परंतु मुकेश अंबानी यांनी उत्तर ऐकूनच गाडी चालू करण्याचा निर्धार केला. तेव्हा नीता यांनी लग्नाला होकार दिला.
मुकेश अंबानी सोबत लग्नानंतर नीता यांनी गृहिणी न राहता काम सांभाळण्याचा निर्णय घेतला. हेच कारण आहे कि नीता अंबानी यांची गणना जगभरातील सशक्त महिलांमध्ये केली जाते. राधिका मर्चंट ची सासूबाई नीता अंबानीच्या वधूरूपावर खिळल्या सर्वांच्या नजरा, पहा फोटोज.