आई बनण्याचा अनुभव प्रत्येक स्त्रीसाठी खूपच खास असतो. एका नवीन जीवाला आपल्यामध्ये ९ ठेवून ती त्याला या जगामध्ये आणते. ९ महिने एका स्त्रीचे शरीर वेगवेगळ्या स्थितीमधून जाते. अनेक प्रकारचे बदल तिच्या शरीरामध्ये येतात. तेव्हा कुठे एक बाळ या जगामध्ये येते. बाळाला जन्म देताना महिलेला तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. असे म्हंटले जाते कि बाळाला जन्म देताना होणाऱ्या वेदना एकाच सर्व हाडे मोडण्याएवढ्या असतात.
आई आणि मुलाचे नाते दर्शवणारे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या सोशल मिडियावर या नात्याला एका वेगळ्या पद्धतीने दर्शवणारा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक बाळ जन्मानंतर त्याच्या आईला सोडण्यास तयार नाही. आईच्या गर्भामधून त्याला डॉक्टरनी तर बाहेर काढले पण ते अशाप्रकारे आपल्या आईला बिलगले कि कोणी देखील त्याला वेगळे करू शकले नाही.
सामान्यतः डॉक्टर्स बाळाच्या डिलिवरी नंतर त्याच्या सफाईसाठी घेऊन जातात. भारतामध्ये बहुतेकवेळा असे होते. बाळाच्या सफाईनंतर त्याला कुटुंबियांकडे दिले जाते. शेवटी त्याला त्याच्या आईकडे नेले जाते. पण विदेशामध्ये असे होत नाही. तिथे बाळाच्या जन्मानंतर त्याला लगेच आईच्या सहवासात ठेवले जाते. त्याला त्याच्या आईच्या स्कीनचा स्पर्श केला जातो. असे म्हंटले जाते कि असे केल्याने दोघांचा संबंध मजबूत होतो.
डॉक्टर्सनी बाळाला जसे त्याच्या आईजवळ नेले ते ते आईच्या चेहऱ्याला बिलगले. कितीही प्रयत्न केला जते ते वेगळे होण्याचे नाव घेत नव्हते. आई देखील बाळाला पाहून भावूक झाली. जवळ जवळ २२ सेकंद दोघे एकमेकांना बिलगले. हा क्युट व्हिडीओ ट्विटरवर शेयर केला आहे. जो सध्या व्हायरल होतोय. आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो वेळा पाहिला गेला आहे. लोकांनी याला खऱ्या प्रेमाची व्याख्या म्हंटले आहे. तुम्ही देखील पहा हा क्युट व्हिडीओ.
The newborn baby who doesn’t want to leave his mother…
Aweeeeeeeee ❤️pic.twitter.com/U39puexcQJ— The Figen (@TheFigen_) March 24, 2023