HomeBollywood“मी तर कुठे व्हर्जिन...” दोन घटस्फोट झालेल्या आणि दोन मुली असलेल्या व्यक्तीसोबत...

“मी तर कुठे व्हर्जिन…” दोन घटस्फोट झालेल्या आणि दोन मुली असलेल्या व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतर नेहा पेंडसेनं केलेलं ‘ते’ वक्तव्य पुन्हा चर्चेत…

बिग बॉस १२ ची स्पर्धक आणि मे आय कम इन मॅडम मधील अभिनेत्री नेहा पेंडसे आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. २९ नोव्हेंबर १९८४ रोजी मुंबईमध्ये जन्मलेली नेहाने एक बालकलाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती.

अभिनेत्रीने ५ जानेवारी २०२० रोजी तिचा लिव इन बॉयफ्रेंड शार्दुल सिंह ब्यास सोबत लग्न केले होते. नेहाने फक्त मोजक्याच जवळच्या लोकांना लग्नामध्ये आमंत्रित केले होते. तिने पुण्यामध्ये महाराष्ट्रीय रीतीरिवाजानुसार शार्दुलसोबत लग्न केले होते. तथापि लग्नानंतर नेहाला प्रचंड ट्रोल केले गेले होते.

यानंतर नेहाने हे देखील म्हंटले होते कि पती शार्दुलने तिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी दोन वेळा लग्न केले होते. एक एक घटस्फोटित होता, त्याच्या दोन लग्नांपासून दोन खूपच क्युट मुली आहेत. अभिनेत्रीने हे देखील म्हंटले होते कि ती देखील कुठे व्ह र्जिन होती. ती पुढे म्हणाली होती कि शार्दुल प्रत्येक भुमिकेवर समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. तो पूर्णपणे सकारात्मक माणूस आहे.

नेहाचा पती शार्दुल लग्नाच्या पूर्वी प्राइमस या प्रोजेक्टवर फोकस करत होता. शार्दुलने यासाठी नेहाला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडले होते. यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. नेहा दोन ते तीन रिलेशनमध्ये अर्हिली होती तर शार्दुलचा दोनवेळा घटस्फोट झाला होता.

दोघांनी एकमेकांसोबत आपल्या वेदना शेयर केल्या आणि हळू हळू ते एकमेकांच्या जवळ आले. नेहाचा बॉयफ्रेंड शार्दुल लग्नाच्यावेळी खूपच जाड होता. नेहाचा फोटो जसा त्याच्यासोबत व्हायरल झाला तसे त्याला सोशल मिडिया युजर्स लठ्ठ बॉयफ्रेंड म्हणत ट्रोल करू लागले होते.

यावर अभिनेत्रीने देखील सडेतोड उत्तर दिले होते, ती म्हणली होती कि, प्रत्येक व्यक्ती तंदुरुस्त असणे आवश्यक नाही, मग तो शारीरिक असो, भावनिक असो किंवा आरोग्याच्या कोणत्याही समस्येचा सामना करत असो, शार्दुल ईटरटेनमेंट इंडस्ट्रीमधून नाही. त्याला ट्रोल करणे लज्जास्पद आहे. दुसरा कोणी सापडला नाही का अशी कमेंट करणे समर्थनीय ठरू शकत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts