ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता १९८० पासून चित्रपटसृष्टी मध्ये सक्रीय आहे. मधील काही काळामध्ये काही वर्षे त्या चित्रपटापासून दूर होत्या, परंतु आता त्या एका पेक्षा एक मोठ्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. नुकतेच नीना गुप्ता ने १९८० च्या वर्ककल्चर बद्दल सांगितले. त्यासोबतच त्यांनी सांगितले कि एका दिग्दर्शकाने तिला सेट वरच आई बहिणीवरून शिव्या दिल्या होत्या, ज्यानंतर त्या सर्वांच्या समोर खूप रडल्या होत्या.
मुलाखतीच्या दरम्यान नीना गुप्ता ला त्यांच्या करिअर च्या सुरुवातीच्या काळातील एक विचित्र घडलेल्या गोष्टीबद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी सांगितले कि एका दिग्दर्शकाने तिला शिव्या दिल्या होत्या. ज्यानंतर त्या सर्वांच्या समोर खूप रडल्या होत्या. नीना गुप्ता ने सांगितले कि, “मी एक चित्रपट करत होते, ज्यामध्ये माझी एक छोटीशी भूमिका होती. एका सीन मध्ये माझे दोन ते तीन डायलॉग होते. चित्रीकरणाच्या दिवशी ते डायलॉग काढून टाकण्यात आले. आता माझ्या जवळ कोणतीही भूमिका नव्हती”.
नीना गुप्ता ने पुढे सांगितले कि, “मी दिग्दर्शकाच्या जवळ गेले आणि म्हणाले कि माझ्या फक्त दोन ओळी होत्या आणि तुम्ही त्यादेखील काढून टाकल्या. त्यानंतर त्याने मला सर्वांच्या समोर आई बहिणीवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विनोद खन्ना आणि जुही चावला आणि सर्व लोक त्या सेट वर हजर होते आणि मी रडण्यास सुरुवात केली कारण त्याने मला सर्वांच्या समक्ष शिव्या दिल्या होत्या”.
तथापि, नीना गुप्ता ने पुढे सांगितले कि आता अशा प्रकारचे वर्ककल्चर इंडस्ट्री मध्ये नाही आहे. तिने सांगितले कि, “मला वाटत नाही कि आज असे होत आहे आणि कदाचित असे होत असेल, परंतु मी आता त्या परिस्थितीत नाही. आता मला कोणीही आई बहिणीच्या शिव्या देऊ शकत नाही”. कामाबद्दल बोलाल तर नीना गुप्ता अलीकडे चित्रपट वध मध्ये दिसल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी संजय मिश्रा सोबत काम केले होते. या चित्रपटामध्ये नीना आणि संजय यांनी पती पत्नीची भूमिका साकारली होती.