HomeBollywoodगुड न्यूज ! घटस्फोटाच्या ४ वर्षानंतर नीना गुप्ताची मुलगी मासाबाने गुपचूप केलं...

गुड न्यूज ! घटस्फोटाच्या ४ वर्षानंतर नीना गुप्ताची मुलगी मासाबाने गुपचूप केलं दुसरं लग्न, फोटो व्हायरल…

नीना गुप्ताची मुलगी मसाबा गुप्ताने लग्न केले आहे. मसाबा अनेक दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता सत्यदीप मिश्राला डेट करत होती. आता फॅशन डिझायनरने घोषणा केली आहे कि तिने इंटीमेट सेरेमनीमध्ये आज सकाळी बॉयफ्रेंडसोबत लग्न केले आहे. मसाबा आणि सत्यदीपच्या लग्नाचा फोटो समोर आला आहे.

मसाबा गुप्ता ‘मसाबा मसाबा’ या नेटफ्लिक्सच्या पॉपुलर सीरीजमध्ये पाहायला मिळाली होती. या शोमध्ये तिच्या पतीच्या भूमिकेमध्ये सत्यादीप पाहायला मिळाला होता. शोच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि दोघांच्या जवळीक वाढली. आता मसाबा आणि सत्यदीपचे लग्न झाले आहे. दोघांमध्ये १८ वर्षाचे अंतर आहे. तिने इंस्टाग्रामवर आपल्या लग्नाचे फोटो शेयर करून घोषणा केली आहे.

तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि माझ्या शांततेने भरलेल्या सागराशी आज सकाळी मी लग्न केले आहे. प्रेम, शांती, स्थिरता या नावाने आपल्या अनेक आयुष्यात येणार आहे… आणि मला कॅप्शन लिहू दिल्याबद्दल धन्यवाद. हे जबरदस्त असणार आहे.

फोटोजमध्ये दोघे पिंक आउटफिट्समध्ये पाहायला मिळत आहेत. मसाबा गुप्ता एक फेमस फॅशन डिझायनर आहे. तिने तिच्या स्वतःच्या ब्रँड हाउस ऑफ मसाबाच्या नवीन वधूच्या कलेक्शनमधील कपडे घातले होते. सत्यादीप मिश्रा बर्फी पिंक सिल्क शेरवानीमध्ये दिसत आहे तर मसाबाने बर्फी पिंक लेहेंगा निवडला आहे. त्याचबरोबर दोघांनी गोल्ड ज्वेलरी घातली होती. मसाबाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि हे एक सिम्पल कोर्ट मॅरेज होता, ज्यामध्ये तिचे कुटुंब सहभागी होते.

मसाबा गुप्ताने सत्यादीप मिश्राच्या अगोदर मधु मंटेनासोबत लग्न केले होते. मधु बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता होता. दोघांचे लग्न २०१५ मध्ये झाले होते. तथापि चार वर्षानंतर २०१९ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. तर सत्यादीप मिश्राचे देखील हे दुसरे लग्न आहे. मसाबा गुप्ताच्या अगोदर त्याने अभिनेत्री अदिती राव हैदरीसोबत लग्न केले होते. हे लग्न २००९ मध्ये झाले होते आणि २०१३ मध्ये मोडले. सत्यादीप मिश्रा नो वन किल्ड जेसिका, बॉम्बे वेल्वेट, चिल्लर पार्टी, फोबिया आणि विक्रम वेधामध्ये दिसला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Masaba (@masabagupta)

 

View this post on Instagram

 

A post shared by Masaba (@masabagupta)

 

View this post on Instagram

 

A post shared by Masaba (@masabagupta)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts