HomeBollywoodजेव्हा रंगेहाथ पकडली गेली होती अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली, घरामधून पार्टीसाठी...

जेव्हा रंगेहाथ पकडली गेली होती अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली, घरामधून पार्टीसाठी निघाली होती आणि…

अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल नेहमी चाहत्यांना उत्सुकता लागलेली असते. अधूनमधून या कुटुंबासंबंधी अनेक गोष्टी समोर येत असतात. पण चाहते नेहमी बिगच्या कुटुंबाविषयी अधिक जाणून घेऊ इच्छितात. अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता बच्चन नुक्तेक तिची आई जया बच्चनसोबत एका पॉडकास्टमध्ये पोहोचली होती. या पॉडकास्टला अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा होस्ट करत होती.

व्हॉट द हेल नव्या नावाच्या या पॉडकास्टमध्ये अनेक रंजक गोष्टी समोर आल्या. नव्या नवेली नंदा, श्वेता बच्चन आणि जया बच्चनने या पॉडकास्टमध्ये फक्त एक सेलेब्रिटी म्हणून आपल्या पर्सनल लाईफविषयी डिसकस केले. तर एकमेकांसोबतच्या नात्यांबद्दल देखील अनेक गुपिते उघड केली.

या खास एपिसोडमध्ये श्वेता बच्चन आणि जया बच्चनने सांगितले कि नव्या नवेली नंदा सर्वात मोठी खोटारडी आहे. श्वेता आणि जयाने सांगितले कि नव्याचा खोटारडेपणा अनेकवेळेला पकडला जातो, कारण ती खूपच छोट्या गोष्टीवर खोटे बोलते.

श्वेताने नव्याच्या खोटारडेपणाचा एक किस्सा देखील सांगितला. ती म्हणाली कि काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एकदा दिल्लीमध्ये अगस्त्य आणि नव्या एका पार्टीमध्ये गेले होते. तिथे एक डेडलाईन दिली गेली होती आणि हे लोक त्यापेक्षा खूपच जास्त लेट झाले होते. तेव्हा मी त्यांना कॉल करून विचारले कि तुम्ही कुठे आहात ? आणि नव्याने उत्तर दिले, आम्ही आता घरामध्ये जाणारच आहोत. श्वेता बच्चनने सांगितले कि हे लोक तेव्हा पार्टीमध्येच होते.

श्वेताने सांगितले कि नव्या आणि अगस्त्य तेव्हा दिल्लीच्या जवळ एका फार्मवर पार्टी करत होते जे कि घरापासून जवळ जवळ एक तास अंतरावर होते. तेव्हा अगस्त्यने सांगितले कि मॉम तिला असे वाटते का कि आपण मूर्ख आहोत? या पॉडकास्टमध्ये जया बच्चनने हे देखील सांगितले कि मुलांना बाहेर जाण्याची परवानगी नसते. त्यांना फक्त मोजक्याच लोकांसोबत बाहेर जाण्याच्या परवानगी असते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts