आपल्या देशामध्ये लग्नात खाणेपिणे आणि बँडबाजाशिवाय लग्नामध्ये मजा येत नाही. जोपर्यंत लोक लग्नामध्ये डांस करत नाहीत तोपर्यंत लग्न अपूर्णच वाटते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये नवरीच जबरदस्त डांस करताना पाहायला मिळत आहे. तिचा डांस पाहिल्यानंतर नवरदेव देखील आवाक झाला.
एक काळ होता जेव्हा लग्नामध्ये नवरी क्वचितच नजर वर करून पहायची, पण आता काळ बदलला आहे. आता नवरीचे लाजणे तर लांबच राहिले, ती एकएक गोष्टीवर आपली पसंद नापसंद व्यक्त करते आणि लग्नामध्ये खूप एंजॉय करते. नवरीचा बिनधास्त डांस काही नवीन गोष्ट नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओमध्ये एक मुलगी जबरदस्त डांस करताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जयमालाचा आहे. तुम्ही पाहू शकता कि नवरा-नवरी २००० मध्ये आलेल्या बादल चित्रपटामधील सुपरहिट गाणे तुझे देख के दिल मेरा डोले गाण्यावर डांस मूव्ह दाखवत आहे. जेव्हा नवरी असे मूव्ह दाखवत असते तेव्हा नवरदेव तिला पाहतच राहतो.
हा परफॉर्मेंस व्हिडीओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून sanja_ykumar1519 नावाच्या अकाऊंटवरून शेयर करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत जवळ जळव ६ लाख लोकांनी लाईक केले आहे, तर जवळ जवळ ६० लाख पेक्षा जास्त लोकानी हा व्हिडीओ पाहिला आहे. लोकांनी नवरीचे कौतुक करत अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत.
View this post on Instagram