अभिनेत्री नम्रता शिरोडकर ने १९९३ मध्ये मिस इंडिया चा ताज जिंकल्यानंतर चित्रपटात पदार्पण केले होते. तिने सलमान खान चा चित्रपट ‘जब प्यार किसी से होता है’ मध्ये छोट्याशा भूमिकेमधून अभिनयाची सुरुवात केली होती. ज्यानंतर ती ‘वास्तव’ आणि ‘कच्चे धागे’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. या चित्रपटांमधून नम्रता शिरोडकर ने आपला एक वेगळा ठसा उमटवला होता आणि खूपच कमी वेळामध्ये बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध नाव बनली. परंतु नम्रता शिरोडकर चे करिअर ज्यावेळी उंचीवर होते, तिने तेलुगु चित्रपट स्टार महेश बाबू सोबत लग्न केले आणि चित्रपटांमधून बाहेर पडली.
नम्रता शिरोडकर च्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. कोणालाही समजले नाही कि का नम्रता शिरोडकर ने करिअर च्या उंचीवर पोहोचून लग्न केले आणि केले देखील तरी चित्रपट का सोडले? आता नम्रता शिरोडकर ने लग्नाच्या १७ वर्षानंतर सांगितले कि का तिने करिअर निवडण्याऐवजी लग्न करणे पसंत केले.
नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू यांची पहिली भेट २००० मध्ये चित्रपट ‘वापसी’ च्या सेट वर झाली होती आणि २००५ मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नाच्या नंतर नम्रता ने चित्रपटांपासून लांब राहणे पसंत केले आणि कुटुंब संभाळण्यावर जास्त लक्ष दिले. एका युट्युब चैनल ‘प्रेमा द जर्नलिस्ट’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नम्रता शिरोडकर ने सांगितले कि तिने चित्रपट सोडून लग्न करण्याचा निर्णय का घेतला. तिने सांगितले, ‘मी खूपच आळशी होते. जसे कि मी कायम सांगते कि मी काहीही नियोजन केले नव्हते. जे काही झाले ते घडत गेले. मी म्हणू शकते कि मी जे देखील निर्णय घेतले अथवा निवड केली, ते बरोबर होते आणि त्यात मी आनंदी आहे. जेव्हा मी अभिनय क्षेत्रात आले होते कारण मला मॉडेलिंग चा कंटाळा आला होता’.
नम्रता शिरोडकर ने पुढे सांगितले, ‘मॉडेलिंग च्या नंतर अभिनय हेच पुढील पाउल होते. आणि जेव्हा पर्यंत मी माझ्या या कामाचा आनंद घेत होते आणि जेव्हा मी अभिनयाला गांभीर्याने घेतले तेव्हा माझी भेट महेश सोबत झाली. आम्ही लग्न केले. जर मी माझ्या कामाला गांभीर्याने घेतले असते तर आता माझे जीवन यावेळ पेक्षा वेगळे असते. मी काही तक्रार करत नाही. माझ्या जीवनातील सर्वात आनंदी क्षण तो होता जेव्हा महेश आणि मी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माझे पूर्ण जीवन बदलून गेले. लग्नाचा अनुभव कमालीचा होता. मातृत्व आणि आई होण्याचा अनुभवही खूप वेगळा होता. मला नाही वाटत कि याला मी कोणत्याही प्रकारे बदलू शकेन.
नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू ने त्यांचा चित्रपट अथडू चे चित्रीकरण पूर्ण करून २००५ मध्ये लग्न केले होते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी हे. नम्रता सध्या कुटुंबासोबत हैदराबाद मध्ये राहत आहे आणि पती महेश बाबू चे काम सांभाळते. नम्रता शिरोडकर चित्रपट निर्माता देखील बनली आहे. तिने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘मेजर’ निर्माण केला होता.