९० च्या दशकामधील बॉलीवूड चित्रपटांची क्रेज काही वेगळीच राहिली आहे. फक्त चित्रपटच नाही तर त्यामधील गाणी देखील खूप खास असायची. काही गाणी तर आजदेखील सदाबहार आहेत आणि ती पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. असेच एक गाणे ९० च्या दशकामध्ये हिट झाले होते. मोहरा चित्रपटामधील ‘ना कजरे की धार, ना मोतियों के हार…’. गाणे सुपर डुपर हिट झाले होते. हे गाणे सुनील शेट्टी आणि पूनम झवरवर चित्रित केले गेले होते. चित्रपटामध्ये पूनमची छोटी भूमिका होती पण या गाण्यामुळे ती रातोरात फेमस झाली होती.
१९९४ मध्ये मोहरा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि रविना टंडन मुख्य भूमिकेमध्ये होते. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. खास गोष्ट हि होती कि चित्रपटामधील गाणी देखील दर्शकांना खूप आवडली होती. चित्रपटामधील गाणे ‘ना कजरे की धार…’ आज देखील तितकेच फेमस आहे.
ना कजरे की धार…’ हे एक रोमँटिक गाणे होते, जे सुनील शेट्टी आणि पूनम झवरवर चित्रपट केले गेले होते. या गाण्यामध्ये पूनम साडीमध्ये खूपच सुंदर दिसली होती. जेव्हा चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा सर्वजण जाणून ग्नेयासाठी उत्सुक होते कि हि सुंदर मुलगी कोण आहे. चित्रपटानंतर या गाण्याद्वारे पूनम खूपच लोकप्रिय झाली होती. पण नंतर ती चित्रपटामध्ये सफल झाली नाही. त्यानंतर तिने साऊथ चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. यानंतर तिने प्रॉडक्शनच्या दुनियेतही हात आजमावला. अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटात ती साध्वीच्या भूमिकेत दिसली होती.
पूनमने ज्या साधेपणाने ‘ना कजरे की धार…’ गाण्यामधून लोकांना आपले दिवाने बनवले होते त्याच्या उलट ती खूपच ग्लॅमरस झाली आहे. ती सोशल मिडियावर सक्रीय राहते आणि नेहमी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आपले व्हिडीओ शेयर करते. नुकतेच तिने एक व्हिडीओ शेयर केला आहे. पूनम मराठी चित्रपटामध्ये देखील सक्रीय आहे. त्याचबरोबर ती सोशल वर्कसोबत देखील जोडली गेली आहे.
View this post on Instagram