HomeViralरमजानच्या पवित्र महिन्यामध्ये मुस्लीम महिलेने गायले श्री कृष्णासाठी ‘कन्हैया...' गाणे, व्हिडीओ झाला...

रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये मुस्लीम महिलेने गायले श्री कृष्णासाठी ‘कन्हैया…’ गाणे, व्हिडीओ झाला व्हायरल, लोक करू लगले कौतुक…

सोशल मिडियावर अनेकवेळा असे काही पाहायला मिळते जे हृदयाला स्पर्श करते. तुम्ही म्हणायला भाग पडता कि माझा भारत देश तर असाच आहे. असाच एक व्हिडीओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. यामध्ये मुश्ल्मी महिला रमजानच्या पूर्व संध्येवर श्रीकृष्णासाठी ‘कन्हैया, याद है कुछ भी हमारी’ हि प्रसिद्ध कव्वाली म्हणताना दिसत हे. व्हिडीओ पाहता पाहता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. लोक तिचे खूप कौतुक देखील करता आहेत.

काही दिवसांपूर्वी वजीहा अतहर नकवीने ट्विटरवर हा व्हिडीओ शेयर केला होता. हा गोड व्हिडीओ अनेक गोष्टी बाजूला करत लोकांचा धर्म, भाषा आणि मूळ ची पर्वा न करता एकजूट करत आहे. व्हिडीओ शेयर करत वजीहाने लिहिले आहे कि रमजानच्या पूर्व संध्येवर नवाब सादिक जंग बहादुर चित्रपटामधील प्रसिद्ध कलाम ‘कन्हैया’ला गाऊन खूपच आनंद झाला. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर आगीसारखा व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये वजीहा अतहर नकवीला सोफ्यावर बसून कन्हैया, याद है कुछ भी हमारी कव्वाली गाताना पाहू शकता.

आपल्या स्वतःच्या ट्वीटला उत्तर देताना वजीहाने लिहिले आहे कि कन्हैया कृष्णसाठी एक गीत आहे आणि पवित्र पैगंबरसाठी एक रूपक देखील आहे जसे कि दक्षिण आशियातील इंडो-पर्शियन साहित्यिक परंपरेत सामान्य असलेल्या पवित्र संदेष्ट्याचे रूपक आहे. हि कव्वाली त्या मुलाकडून सुरूच आहे आणि ज्यांच्याकडून मला पहिल्यांदा शिकण्याचा बहुमान मिळाला. हा व्हिडिओ २३ मार्च रोजी शेअर करण्यात आला होता, तेव्हापासून तो सुमारे ४८ हजार वेळा पाहिला गेला आहे. हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. ही संख्या खूप वेगाने वाढत आहे.

व्हिडीओ पाहून युजर्स वजीहाचे कौतुक करत आहेत. एकाने लिहिले आहे कि किती सुंदर आणि भाग्यवान आहात कि तुम्ही याला आपल्या हातामध्ये पकडत आहात. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि प्रसिद्ध कव्वाल भाई फरीद अयाज आणि अबू मुहम्मद द्वारा ‘कन्हैया’ चीप रस्तुती माझ्या आवडत्यापैकी एक आहे. तुमचे गाणे ऐकून खूप छान वाटले. तर एकाने लिहिले आहे कि सकाळी सकाळी हे ऐकून मनाला शांती मिळते. समुदायांना एकजूट करत राहा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts