HomeViralजुळ्या मुलांना घेऊन मुंबईला पोहोचली मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानी, नातवांच्या आगमनानिमित्त...

जुळ्या मुलांना घेऊन मुंबईला पोहोचली मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानी, नातवांच्या आगमनानिमित्त अंबानी परिवार करणार तब्बल इतके किलो सोनं दान…

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आपल्या जुळ्या मुलांना घेऊन भारतात आली आहे. ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांची नवे कृष्णा आनंद पिरामल आणि आदिया आनंद पिरामल अशी आहेत. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी ईशाने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. आता त्यांना एक महिना झाला आहे, ज्याबद्दल अंबानी कुटुंबाने एक स्टेटमेंट जरी केले होते. मुलांना एक महिना झाल्यानंतर आता ईशा मुलांना घेऊन मुंबईला आली आहे, ज्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाले आहेत.

सोशल मिडियावर ईशाचे फोटो आणि व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहेत. याआधी व्हायरल भैयानीने अंबानी आणि पिरामल कुटुंबाच्या तयारीचे काही फोटो आणि व्हिडीओ शेयर केले, जे खूपच वेगाने व्हायरल होत आहेत. घराला खूपच सुंदर सजवले आहे आणि पूर्ण सुरक्षेमध्ये सर्वांना विमानतळावरून घरी आणले आहे.

असे म्हंटले जात आहे कि या खास प्रसंगी अनेक पंडित आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अंबानी कुटुंब या खास प्रसंगी जवळ जवळ ३०० किलो सोनं दान करणार आहे. इतकेच नाही तर ईशा आणि मुलांसाठी देश विदेशातील मंदिरांमधून प्रसाद देखील आणला गेला आहे, ज्यामध्ये तिरुपती बालाजी पासून ते द्वारकाधीश मंदिर सामील आहेत.

माहितीनुसार ईशा आणि मुले कतर एयरवेजच्या स्पेशल फ्लाईटने मुंबईला आले. इतकेच नाही तर ईशाला मुंबईला आणण्यासाठी हाईली प्रोफेशनल डॉक्टर्सची एक टीम लॉस एंजेलिस (यूएसए) येथे गेली होती, जे ईशा सोबत परत आले आहेत. तर अमेरिकाचे बेस्ट पीडियाट्रिशियन्सपैकी एक डॉक्टर गिब्सन देखील कृष्णा आणि आदियाच्या फ्लाईट ट्रेवलदरम्यान त्यांच्यासोबत होते.

माहितीनुसार पर्किन्स आणि विलने करुणा सिंधू आणि अँटिलियामध्ये थोडासा बदल केला आहे, ज्यामुळे मुलांना थेट नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळू शकेल. ज्यामध्ये फिरणारे बेड आणि ऑटोमेटेड सनरूफचाही समावेश आहे. असे म्हंटले जात आहे कि कृष्णा आणि आदियाला जगातील फेमस ब्रँड डोल्से अँड गब्बाना, गुच्ची आणि लोरो पियानाचे कस्टमाइज्ड कपडे घातले जात आहेत.

कारच्या सीट्सला देखील मुलांनुसार बीएमडबल्यूने मॉडिफाई केले आहे. जेणेकरून कारमध्ये मुलांच्या प्रवास सुखकर व्हावा. ईशासोबत कृष्णा आणि आदियाचा प्रवास सुखकर करण्यासाठी अमेरिकाचे ८ खास प्रशिक्षित आया देखील भारतामध्ये आल्या आहेत. इतकेच नाही तर ह्या आया भारतामध्ये देखील मुलांची देखभाल करतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by HT City (@htcity)

 

View this post on Instagram

 

A post shared by HT City (@htcity)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts