HomeLifeStyleआलिया-बिपाशा नंतर आता मुकेश अंबानीच्या घरी झाले जुळ्या मुलांचे आगमन, मुलगी ईशा...

आलिया-बिपाशा नंतर आता मुकेश अंबानीच्या घरी झाले जुळ्या मुलांचे आगमन, मुलगी ईशा अंबानी झाली आई, पहा ‘हि’ ठेवली मुलांची नावे…

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अंबानी कुटुंब आणि पिरामल कुटुंबाकडून जारी केलेल्या माहितीमध्ये असे सांगण्यात आले आहे कि ईशा अंबानीने १९ नोव्हेंबर २०२२ रोजी जुळ्यांना जन्म दिला आहे, ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

स्टेटमेंटमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की ईशा आणि आनंद पिरामल यांना जुळी मुलं झाली आहेत आणि आई ईशासोबत त्यांची दोन्ही मुलंही स्वस्थ आहेत. मुलाचे नाव कृष्ण आणि मुलीचे नाव आदिया सांगितले जात आहे आणि दोघेही स्वस्थ आहेत.

मुकेश आणि नीता अंबानीसोबत ईशा अंबानीचे पती पीरामलचे आईवडील अजय आणि स्वाति पीरामलच्या यांच्या संयुक्त स्टेटमेंटमध्ये म्हंटले गेले आहे कि आम्हाला जुळ्या मुलांचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे आणि त्यांच्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छांची अपेक्षा आहे. हा त्यांच्या आयुष्यामधील सर्वात महत्वपूर्ण टप्पा आहे.

२०१८ मध्ये ईशा अंबानीचे लग्न हेल्थकेयर बिजनेस ग्रुप पीरामलचे मालक अजय पीरामलचा मुलगा आनंद पीरामल सोबत झाले होते. त्यांचे लग्न देशामधील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक आहे, ज्यामध्ये देश, बॉलीवूड आणि जगभरामधील अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला होता.

मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानीला नुकतेच रिलायंस रिटेल वेंचर्सचे डायरेक्टर बनवले गेले आहे. मुकेश अंबानीच्या तीन मुलांमध्ये ईशा अंबानी सर्वात मोठी आहे. तिने अमेरिकामधी येल यूनिवर्सिटीमधून साइकोलॉजी मधून ग्रॅजुएशन डिग्री मिळवली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts