HomeBollywoodलग्नापूर्वीच ‘या’ अभिनेत्रीला व्हायचे आहे आई, म्हणाली; फक्त आई होण्यासाठी मला असा...

लग्नापूर्वीच ‘या’ अभिनेत्रीला व्हायचे आहे आई, म्हणाली; फक्त आई होण्यासाठी मला असा पार्टनर हवा आहे जो…

साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री सध्या खूपच चर्चेमध्ये आहेत. यामध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूरचे देखील नाव सामील आहे. मृणाल नुकतेच सीता रमण या तेलगु चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. या चित्रपटामध्ये ती दुलकर सलमान या सुपरस्टारसोबत रोमांस करताना पाहायला मिळाली होती आणि अनेकजणांनी तिच्या लुकची तुलना फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्री मधुबालासोबत देखील केली आहे.

मृणालच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. मृणालने ३० व्या वर्षी डेटींगच्या जुन्या धारणा मोडत सांगितले कि आपल्या लव्ह लाईफमध्ये कसे पुढे जायला हवे आणि तिच्या पार्टनरमध्ये ती काय पाहते. इतकेच नाही कि तर तिने तिच्या बेबीच्या प्लानिंगबद्दल देखील आपले मत व्यक्त केले आहे. वास्तविक मृणाल बंबलच्या डेटिंग दिस नाईट्सच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये भाग घेताना पाहायला मिळणार आहे. यामध्ये तिच्यासोबत श्रिया पिळगावकर देखील दिसणार आहे. हा एपिसोड १५ सप्टेंबरला प्रसारित केला जाणार आहे.

मृणाल आपल्या पार्टनरमध्ये असलेल्या गोष्टींबद्दल सांगताना म्हणाली कि, माझ्या जोडीदारासाठी हे समजणे खूप महत्वाचे आहे कि मी कुठून येते, माझ्या मनामध्ये काय चालू आहे आणि आम्ही कोणत्या पेशामध्ये आहोत. आपल्या चारी बाजूला इतकी असुरक्षा आहे यामुळे मला एक असा व्यक्ती पाहिजे जो सुरक्षित असावा आणि याला स्वीकारण्यासाठी पर्याप्त असावा. असे खूपच कमी होते कि आपल्याला अशी माणसे मिळतात.

बेबीच्या प्लानिंगवर मत व्यक्त करताना मृणाल म्हणाली कि मला अनेकवेळा वाटते कि मला एक मुल जन्माला घालायचे आहे. यामध्ये मृणालच्या आईने देखील तिला सपोर्ट केले. तिच्या आईचे म्हणणे आहे कि तिने आपले एग्ज फ्रीज करावेत किंवा तिने एक सिंगल मदर बनावे. तर लव्ह लाईफबद्दल मृणाल म्हणाली कि, मला प्रेमात पडायचे नाही मी प्रेमात उठायचे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts