भारताचा विस्फोटक फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. तो फक्त भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्याच्या खेळामुळे, लुकमुळे आणि त्याच्या वागण्यामुळे तो प्रचंड फेमस आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये फिमेल फॉलोईंग देखील खूप आहे.
यामध्ये अनेक अभिनेत्रींचा देखील समावेश होतो. मराठी अभिनेत्री मृणाल ठाकूरने देखील विराट बद्दलचे प्रेम अनेक वर्षांनंतर व्यक्त केले आहे. काही वर्षांपूर्वी तिला विराट कोहली खूपच आवडत होता. ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.
नुकतेच एका मुलाखतीदरम्यान तिने खुलासा केला आहे. ती म्हणाली कि, मला क्रिकेट खुप आवडते. या खेळाची आवड मिला माझ्या भावामुळे लागली. माझ्या शाळेच्या दिवसांमध्ये मी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. मी क्रिकेट खेळण्यात खूपच तरबेज होते.
त्याचबरोबर मला फुटबॉल आणि बास्केटबॉल हे खेळ देखील आवडत होते. कोहली बद्दल बोलताना ती पुढे म्हणाली कि एक वेळ अशी होती जेव्हा मला विराट कोहली खूपच आवडत होता. मी त्याच्यासाठी खूपच वेडी होते. मला चांगलच आठवत आहे कि मी निळी जर्सी घालून एकदा भारतीय टीमसाठी चीयर केले होते.
अभिनेत्री मृणाल मराठी चित्रपटासोबत तेलगु चित्रपटामध्ये देखील दिसली आहे. नुकत्याच आलेल्या सीता रामम् चित्रपटामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती. चित्रपटामध्ये दुलकर सलमान आणि रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेमध्ये होते. यासोबत मृणालचे धमाका आणि जर्सी हे चित्रपट देखील रिलीज झाले आहेत. धमाका ती कार्तिक आर्यनसोबत तर जर्सीमध्ये शाहिद कपूरसोबत पाहायला मिळाली आहे.
View this post on Instagram