सोशल मीडियावर आपल्याला अनेकवेळा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे तुमचे मन जिंकतात. माणसांशिवाय प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ देखील सोशल मिडियावर खूप व्हायरल होतात. जे पाहून त्यांच्या भावना कळतात. आईला आपल्या मुलांची किती काळजी असते हे जाणवू लागते.
आई मानव असो वा प्राणी, मुलांची सुरक्षितता आणि आनंद ही प्रत्येक आईची पहिली प्राथमिकता असते, ज्यासाठी ती स्वतःला संकटात टाकण्यास मागेपुढे पाहत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात कोंबडी आणि पिल्लांचे प्रेम पाहून तुमचे मन भरून येईल.
@Gabriele_Corno या ट्विटर अकाऊंटवर असाच एक व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. ज्यामध्ये स्वतःच्या पिलांना वाचवण्यासाठी कोंबडीचे बलिदान पाहून लोक हळवे झाले आहेत. आपल्या पिलांना मुसळधार पावसापासून वाचवण्यासाठी, कोंबडीने तिचे पंख पसरवले आणि त्यांच्यासाठी एक संरक्षक कवच बनवले आणि स्वतः भिजत राहिली. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक म्हणाले की आई अशीच असते. या व्हिडिओला आतापर्यंत २० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता कि एक कोंबडी मुसळधार पावसात उभी आहे आणि तिने पंख पसरून पिल्लांना संरक्षणासाठी आत लपवले आहे. खरंतर ती मुलांना पावसात भिजण्यापासून वाचवण्यासाठी हे करत आहे. ती स्वतः पावसात भिजत राहिली. हा व्हिडिओ सर्वांची मनं जिंकत आहे. यासोबतच एक आई आपल्या मुलांसाठी काय करू शकते, याचीही जाणीव होते. आई ही आपल्या मुलांची शिक्षिका, सल्लागार, संरक्षक कवच असते. मुलांना संकटात पाहून आई स्वतःची काळजी सोडून त्यांच्या सुरक्षेत गुंतते. व्हायरल झालेल्या व्हिडीओप्रमाणेच कोंबडी स्वतः पावसामध्ये भिजत मुलांना पावसापासून वाचवत आहे.
ज्याने हा व्हिडिओ पाहिला तो आईला वंदन केल्याशिवाय राहू शकला नाही. मुलांप्रती कोंबडीचे समर्पण पाहून लोक भारावून जात आहेत. युजर्स व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत एका यूजरने लिहिले- ‘आई नेहमीच आई असते मग ती मानव असो वा प्राणी’. लहान असहाय्य प्राण्यांनाही ओळखणारी आईची भूमिका पहा. असे बरेच युजर्स आहेत ज्यांनी लिहिले – व्हिडिओ निर्मात्याने कॅमेरा खाली ठेवला पाहिजे आणि पक्ष्यांना प्रथम मदत केली पाहिजे. अप्रतिम आणि हृदयस्पर्शी व्हिडिओला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
Mother Hen Shelters Her Chicks in the Rain pic.twitter.com/uC3sTCkUAx
— Gabriele Corno (@Gabriele_Corno) February 22, 2023