गोष्ट एका अशा अभिनेत्रीची जिने चित्रपटांमध्ये भलेही प्रमुख भूमिका केली नाही परंतु तिची प्रसिद्धी एखाद्या अभिनेत्री प्रमाणे आहे. आम्ही सांगत आहोत १८ सप्टेंबर १९६२ ला तामिळनाडू मधील नागपट्टीनम च्या जवळ जन्मलेली तमिळ अभिनेत्री निशा नूर जिचे जीवन खूपच कठीण होते.
मिडिया रिपोर्टनुसार निशा नूर चे चित्रपट करिअर १५ वर्षांचे होते. अभिनेत्रीने १९८० मध्ये चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि १९९५ पर्यंत चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका करताना दिसत होती. सांगितले जाते कि निशा भलेही चित्रपटांमध्ये लहान भूमिका करत होती परंतु ती खूप सुंदर होती त्यामुळे तिचे चाहते मोठ्या संख्येने होते.
तुम्ही पाहिले असेल १९८१ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘टिक टिक टिक’ पासून निशा ने करिअर ची सुरुवात केली होती. तथापि, ९० च्या दशकात येतायेता निशा नूर ला काम मिळणे खूप कमी झाले होते आणि इथूनच सुरु झाले अभिनेत्रीचे वाईट दिवस. सांगितले जाते कि चित्रपटांमध्ये काम मिळणे बंद झाल्यानंतर निशा ची आर्थिक परिस्थिती खूप वाईट झाली होती. मिडिया रिपोर्टनुसार पैशांची कमतरता पूर्ण करण्यासाठी निशा शरीरविक्रीच्या चिखलात उतरली होती. तिला असे करण्याचा सल्ला एका निर्मात्याने दिला होता. मात्र, असे करून आपले पोट भरताना निशा ला एड्स सारखा भयानक आजार झाला.
काही काळानंतर हे काम देखील थांबले गेले. निशा चे खूप वाईट दिवस सुरु झाले होते. वर्ष २००७ मध्ये निशा, नागूर येथील एका दर्गाह च्या बाहेर बेवारस अवस्थेत मिळून आली. अभिनेत्रीच्या शरीराला किड लागली होती. सांगितले जाते कि अभिनेत्रीच्या एका कौटुंबिक सदस्याने तिला एका एनजीओ मध्ये दाखल केले होते, जिथे तिचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिडिया रिपोर्टनुसार निशा चे कुटुंबीय तिची अवस्था पाहून एवढे घाबरले होते कि तिच्या अंतिम संस्कार करण्यास देखील आले नाहीत.