बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा सीजन सुरु आहे. गेल्या महिन्यामध्ये २३ तारखेला सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल खंडाळ्यात लग्न केले. दोघांनी चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याच निर्णय घेतला. त्यांतर ७ फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी देखील विवाह बंधनात अडकले. त्यांनी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न केले. या लग्नामध्ये शाहिद कपूर, मीरा राजपूत, करण जौहर, मनीष मल्होत्रा, वरुण धवन, अश्विनी यरदी आणि ईशा अंबानी यांनी हजेरी लागली होती.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर: अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री मलायका अरोरा बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये आहे. दोघांचे अनेक फोटो सोशल मिडियावर पाहायला मिळतात. पण त्यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे लोक त्यांना नेहमी ट्रोल करतात. तथापि मलायका अरोराने तिच्या मूविंग ऑन विथ मलायका शोमध्ये खुलासा केला आहे दोघे लवकरच लग्न करू शकतात. असा अंदाज लावला जात आहे कि हे कपल याच वर्षी सात फेरे घेऊ शकते.
राकुल प्रीत सिंघ आणि जॅकी भगनानी: बॉलीवूड चित्रपट निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानी आणि अभिनेत्री राकुल प्रीत सिंह यांचे रिलेशन लॉकडाऊन दरम्यान सुरु झाले होते. लॉकडाऊन दरम्यान दोघे कॉमन फ्रेंडद्वारे भेटले आणि त्यांच्यामध्ये जवळीक वाढली. सध्या दोघे एकमेकांसोबत नेहमी स्पॉट होतात. सोशल मिडियाद्वारे त्यांनी आपले रिलेशन पब्लिक देखील केले आहे. चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची आतुरता लागली आहे.
नंदिता महतानी आणि विद्युत जामवाल: नंदिता महतानी आणि विद्युत जामवाल यांनी एका वर्षापूर्वी सोशल मिडियाद्वारे आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. गेल्या वर्षी दोघांनी एंगेजमेंट देखील केली होती. अशामध्ये आता चाहते असा अंदाज लावत आहे कि हे कपल यावर्षी लग्न करू शकते.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल: सलमान खानचा जवळचा मित्र इकबाल रतनसीचा मुलगा झहीर इक्बाल आणि शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षी सिन्हा यांचे अफेयर बऱ्याच दिवसापासून सुरु आहे. तथापि दोघांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. असे म्हंटले जाते कि दोघांनी गुपचूप लं केले आहे. याबद्दल सोनाक्षीला सोशल मिडियावर खूप ट्रोल केले गेले होते. दरम्यान सोनाक्षी सिन्हाने २०२२ मध्ये या फक्त अफवा असल्याचे सांगितले होते. अशामध्ये आता चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी: हे वर्ष एका शाही विवाहाचे साक्षीदार होणार आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती विरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांची गेल्या महिन्यामध्ये एंगेजमेंट झाली आहे. अँटिलिया येथे गोल धना आणि चुनरी विधी पार पडले होते. राजस्थानच्या नाथद्वाराच्या श्रीनाथ जी मंदिरमध्ये २९ डिसेंबर २०२२ रोजी अनंत आणि राधिकाची रोका सेरेमनी झाली होती. अनंत आणि राधिका खूप दिवसांपासून एकमेकांच्या मित्र आहेत.