HomeCricketदोन लग्न दोन घटस्फोट, अपघातामध्ये मुलाचा मृत्यू, एका क्षणाममध्ये करियर संपलं, असं...

दोन लग्न दोन घटस्फोट, अपघातामध्ये मुलाचा मृत्यू, एका क्षणाममध्ये करियर संपलं, असं होतं अझरुद्दीनचं आयुष्य…

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनची गणना भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. क्रिकेटच्या मैदानापासून दूर असून देखील कमेंट्री आणि आपल्या वक्तव्यांमुळे तो नेहमीच चर्चेमध्ये बनून राहतो.

भारतीय टीमचा दुसरा सर्वात सफल एकदिवसीय कर्णधार राहिलेला मोहम्मद अझरुद्दीनचे पर्सनल लाईफमध्ये खूपच चढउताराचे राहिले. त्याने दोन लग्न केले होते आणि दोन्ही वेळा त्याचा घटस्फोट झाला. मोहम्मद अझरुद्दीनचे पहिले लग्न १९८७ मध्ये नौशीन खानसोबत झाले होते. दोघांना एक मुलगा झाला. हे लग्न जवळ जवळ ९ वर्षे टिकले.

बॉलीवूड अभिनेत्री संगीता बिजलानी अझहरच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर त्याने पहिल्या पत्नीला १९९६ मध्ये घटस्फोट दिला. नौरीनसोबत घातोस्फोट घेतल्यानंतर त्याच वर्षी त्याने संगीता बिजलानीसोबत दुसरे लग्न केले. हे लग्न जवळ जवळ १४ वर्षे टिकेल. २०१० मध्ये अझहरने संगीता बिजलानीला घटस्फोट दिला.

संगीता बिजलानीला घटस्फोट देण्याचे मुख्य कारण स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टासोबतच्या अझरुद्दीनच्या अफेअरच्या चर्चा होत्या. तथापि नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर अझरुद्दीनचे नाव आणखी एका अमेरिकन महिला शैनन मैरीसोबत देखील जोडले गेले. २०१५ मध्ये त्यांच्या लग्नाच्या बातम्या देखील आल्या होत्या. तथापि नंतर त्या चुकीच्या असल्याचे समोर आले.

धोनीनंतर मोहम्मद अझरुद्दीन हा भारतातील सर्वात यशस्वी वनडे कर्णधार आहे. त्याने आपल्या कसोटी करियरमध्ये ९९ सामने खेळले तर एकदिवसीय कारकिर्दीत त्याने ३३४ सामने खेळले. त्याने कसोटी करियरमध्ये ६२१४ धावा केल्या तर वनडेमध्ये ९३७८ धावा केल्या.

एकदिवसीय क्रिकेटमध्येही अझहरच्या नावावर १२ विकेट्स आहेत. त्याची कसोटी करियरमधील सर्वोच्च धावसंख्या १९९ होती. होती तर १५३ हि त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या आहे. पदार्पणानंतर सलग तीन सामन्यांमध्ये शतक झळकावण्याचा विश्वविक्रमही अझरच्या नावावर आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts