HomeBollywoodरीता फारिया पासून जूही चावला पर्यंत जाणून घ्या सध्या काय करतात मिस...

रीता फारिया पासून जूही चावला पर्यंत जाणून घ्या सध्या काय करतात मिस इंडिया राहिलेल्या ‘या’ सौंदर्यवती…

कर्नाटकची २१ वर्षाची मॉडल सिनी शेट्टी फेमिना मिस इंडिया बनली आहे. हा एक असा किताब असतो ज्यामुळे एक मुलगी रातोरात प्रसिद्ध होते. मॉडलिंग पासून चित्रपटांपर्यंत अनेक ऑफर्स तिला येऊ लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का कि हा किताब जिंकलेल्या इतर मिस इंडिया आज कुठे आहेत आणि काय करतात.

रीता फारिया: रीता फारिया असे नाव आहे जिने भारताचे नाव जगामध्ये फेमस केले. १९६६ मध्ये मिस इंडिया बनलेल्या रीताने मिस वर्ल्डचा किताब जिंकून इतिहास रचला होता. जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब जिंकल्यानंतर ती डॉक्टर बनली. तिला मॉडलिंग आणि चित्रपटांसाठी देखील अनेक ऑफर्स आल्या पण तिने मेडिकलमध्ये करियर बनवले. नंतर ती लग्न करून आयर्लंडमध्ये शिफ्ट झाली.

संगीता बिजलानी: १९८० मध्ये संगीता बिजलानीने मिस इंडियाचा किताब आपल्या नावावर केला होता. मिस इंडिया बनल्यानंतर तिला चित्रपटांसाठी अनेक ऑफर्स आल्या पण तिचे फिल्मी करियर काही खास राहिले नाही. सलमान खान आणि क्रिकेटर अजहरुद्दीनसोबतच्या अफेयर्समुळे ती खूप चर्चेमध्ये राहिली. सध्या ती रियालिटी शो जज करते.

जूही चावला: जुही चावला १९८६ मध्ये मिस इंडिया झाली होती. नंतर तिला अनेक चित्रपटांचे ऑफर्स आले. जुही चावलाने फिल्मी करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. जुही आज देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे आणि ती रियालिटी शो देखील जज करते.

मेहर जेसिया: १९८६ मध्ये मेहर जेसिया मिस इंडिया बनली होती. तिने सुपर मॉडल म्हणून आपले करियर केले. ती एक उत्कृष खेळाडू देखील राहिली आहे. सुरुवातीला तिला एक एथलीट बनायचे होते पण मिस इंडिया बनल्यानंतर तिने मॉडलिंगमध्ये करियर बनवले. बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालसोबत तिने लग्न केले. २०१६ मध्ये तिने एक प्रोडक्शन कंपनी देखील सुरु केली होती.

सेलिना जेटली: सेलिना जेटली मिस इंडिया बनण्यापूर्वी सेनेमध्ये अधिकारी म्हणून काम करत होती. तिने डिफेंस परीक्षा देखील पास केली होती. पण मिस इंडियाचा किताब मिळाल्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये करियर बनवण्याचा निर्णय घेतला. तथापि तिने २०१९ मध्ये बॉलीवूडला रामराम ठोकला. सध्या सेलिना आपल्या मुलांसोबत ऑस्ट्रियामध्ये राहते.

प्रियदर्शिनी चटर्जी: २०१६ मध्ये प्रियदर्शिनी चटर्जीने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. तिने मॉडलिंगमध्ये चांगले करियर बनवले. ग्लॅमर शिवाय तिने भारतामध्ये बाल यौ न शो षण विरुद्ध सारख्या सामाजिक कामांमध्ये देखील सहभाग घेतला. आज देखील ती सामाजिक कार्यामध्ये सक्रीय आहे.

तनुश्री दत्ता: तनुश्री दत्ता २००४ मध्ये मिस इंडिया बनली होती. तिने बॉलीवूडमध्ये देखील करियर बनवले, पण काही वर्षांनंतर तिने फिल्म इंडस्ट्री सोडून दिली. २०१८ मध्ये ती तेव्हा चर्चेमध्ये आली होती जेव्हा #MeToo दरम्यान तिने नाना पाटेकरवर अनेक गं भी र आ रो प लावले होते. सध्या तनुश्री अमेरिकेमध्ये राहते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts