HomeBollywood१९९४ मध्ये ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड बनली होती तेव्हा अशी दिसत होती,...

१९९४ मध्ये ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड बनली होती तेव्हा अशी दिसत होती, २९ वर्षे जुना व्हिडीओ झाला व्हायरल, तिच्या निरागसतेवर फिदा झाले चाहते…

सुंदर निळे डोळे, सुंदर तेजस्वी हास्य आणि सुंदर चेहरा. होय आम्ही इथे ऐश्वर्या रायबदल बोलत आहोत. १९ नोव्हेंबर १९९४ हा दिवस तिच्यासाठी खूपच खास होता. याच दिवशी भारताच्या या सुंदरीने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर करून देशाची उंचावली होती. जवळ जवळ २९ वर्षांपूर्वी ऐश्वर्याने हा किताब जिंकला होता, त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील तेज पाहण्यासारखे होते. १९९४-९५ मिस वर्ल्ड टूरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे.

मरून कलरच्या सिंपल साडीमध्ये ऐश्वर्याचे सौंदर्य विलक्षण दिसत आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये २९ वर्षांपूर्वीच्या ऐश्वर्याला इंडियन आणि वेस्टर्न लुकमध्ये पाहू शकता. तिच्या चालण्याची पद्धत असो किंवा बोलण्याची पद्धत, प्रत्येक गोष्टीमध्ये एक अनोखा साधेपणा दिसतो.

ऐश्वर्याने मिस वर्ल्ड स्पर्धेत विचारलेल्या प्रश्नांची चोख उत्तरे देऊन हा किताब जिंकला होता. तिथे उपस्थित लोकांना तिच्या सौंदर्याचीच नाही तर तिच्या प्रतिभेची देखील भुरळ पडली होती. सौंदर्यच नाही तर ऐश्वर्याने आपल्या क्षमतेच्या जोरावर हा किताब आपल्या नावावर केला होता.

जेव्हा ऐश्वर्याने विश्व सुंदरी ताज घातला त्यावेळी तिचे वय फक्त २१ वर्षे होते. ऐश्वर्याने ८६ देशांच्या सुंदरींना मागे टाकत हा किताब आपल्या नावावर केला होता. त्यानंतर देखील भारताच्या अनेक सुंदरींनी हा किताब आपल्या नावावर केला, पण आज देखील ऐश्वर्याची सुंदरता जगभरामध्ये चर्चेमध्ये राहते. मिस वर्ल्ड किताब जिंकल्यानंतर तिला बॉलीवूडमध्ये खूप ऑफर मिळू लागल्या आणि नंतर ऐश्वर्याने अभिनयाला आपले प्रोफेशन बनवले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts