मनीषा लांबाने १८ जानेवारी ला तिचा ३८ वा वाढदिवस साजरा केला. १८ जानेवारी १९८५ रोजी जन्मलेल्या मनीषा ने २००५ मध्ये ‘यहां’ चित्रपटातून पदार्पण केले होते. दिल्ली मध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या मनीषाने तिचे शालेय शिक्षण मिरांडा कॉलेज मधून केले आहे. तथापि, मनीषा ने एकदा पत्रकार होण्याचे स्वप्न पाहिले होते पण नशिबाने तिला पडद्यावर आणले.
मनीषा हि अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने तिच्या ग्लॅमरस लुकने खूप धुमाकूळ घातला होता पण एक स्टार नेहमी ज्याची आकांक्षा बाळगतो ते यश मिळवू शकली नाही. मनीषा ने मॉडेलिंग पासून तिच्या करिअर ची सुरुवात केली होती. मनीषा चे सुरुवातीचे दिवस खूपच कठीण होते. तिला कास्टिंग काऊच चा सामना करावा लागला आणि सुरुवातीच्या काळात एका चोरीच्या आरोपाचा किस्सा देखील खूप चर्चेत आला होता.
मनीषा चा सुरुवातीचा एक किस्सा देखील खूप चर्चेत होता. मनीषा तेव्हा मुंबई मध्ये नवीन कामाला आली होती आणि तिने के पीजी घेतला होता. सांगितले जाते कि मनीषा त्या पीजी साठी ५ हजार रुपये देत होती आणि एक दिवस पीजी ची मालकीण अभिनेत्रीवर चोरीचा आरोप लावत होती. मनीषा या खोट्या आरोपामुळे खूप दुखीः झाली आणि रागाने तिने पीजी सोडले. तिने एक लहानशी खोली भाड्याने घेतली होती.
मनीषा ने सोनी, कॅडबरी, हाजमोला, एयरटेल, एलजी आणि सनसिल्क सारख्या अनेक मोठ्या ब्रांड ची जाहिरात केली आहे. त्याव्यतिरिक्त ‘कार्पोरेट’, ‘एंथनी कौन’, ‘बचना ऐ हसीनो’, ‘किडनॅप’, ‘हम तुम’, ‘भेजा फ्राई २’, सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
फिल्मफेअर सोबत बोलताना मनीषा ला विचारले गेले कि जर ती ले स्बि यन बेस्ड चित्रपटामध्ये दिसली तर तिला कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करायला आवडेल. मनीषाने सांगितले होते – कॅटरीना कैफ, मला तिच्या सोबत रोमान्स करायला आवडेल. ती म्हणाली होती कि कतरिना एका एंजेल प्रमाणे दिसते, तथापि मी तिची मैत्रीण नाही आणि कृतज्ञापूर्वक कारण नंतर हे सर्व विचित्र वाटेल.
View this post on Instagram