HomeEntertainmentकोणी रंगात माखले तर कोणी झाले रोमँटिक, मराठी कलाकारांनी अशी साजरी केली...

कोणी रंगात माखले तर कोणी झाले रोमँटिक, मराठी कलाकारांनी अशी साजरी केली धुळवड…पहा फोटोज…

सध्या होळीच्या रंगामध्ये संपूर्ण देश न्हाऊन निघाला आहे. प्रत्येकजण सध्या होळीचा सण जल्लोषामध्ये साजरा करत आहे. दरम्यान मराठी कलाकार देखील रंग खेळण्यापासून स्वतः दूर ठेऊ शकले नाहीत. मराठी कलाकारांनी यंदाची होळी जल्लोषामध्ये साजरी केली. कोणी हातामध्ये पिचकारी घेत धम्माल केली तर काही मराठी कपल्स रोमँटिक झाले. मराठी कलाकारांनी अगदी उत्साहामध्ये धुलीवंदन साजरी केली.

सुख म्हणजे नक्की काय फेम अभिनेता मंदारनं त्याच्या कुटुंबासोबत रंग खेळत यंदाची धुळवड साजरी केली. अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिच्या नवऱ्यासोबत रोमँटिक धुलीवंदन साजरी केली. दोघेही रंगामध्ये न्हाऊन रोमँटिक झालेले पाहायला मिळाले. सुख म्हणजे नक्की काय असतं फेम शालिनीनं पिचकारीने रंगाची उधळण करत होळी साजरी केली.

अभिनेता कुशल बद्रिके होळी खेळण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. तो बँजो वाजवत रंगाने माखलेला पाहायला मिळाला. मराठी अभिनेत्री काजल कातेनं तिच्या नवऱ्यासोबत धुलीवंदन साजरी करत फोटो शेयर केले आहेत. तर अभिनेत्री शर्वरी कुलकर्णीने तिच्या नवऱ्यासोबत घरामध्येच रंग खेळला.

स्वाभिमान सिरीयलमधील प्रसिद्ध अभिनेत्री तिचे रंगाचे माखलेले फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. अभिनेत्री कुंजिका काळवींटने गिरगावमधील चाळीमध्ये रंग खेळत धुळवडीचा आनंद घेतला. तुझेच मी गीत गात आहे मधील बालकलाकार स्वराने तिच्या मित्र मैत्रिणींसोबत जल्लोषामध्ये होळी खेळली.

अभिनेत्री शिवानी बावकर देखील स्वतःला रंग खेळण्यापासून रोखू शकली नाही. तिने रंगाने माखलेले फोटो शेयर केले आहेत. अभिनेता आदिनाथ कोठारेने लेक जिजासोबत होळी सेलेब्रेशन केले. रंग माझा वेगळा सिरीयलमधील अनघा अतुल आणि ठिपक्यांची रांगोळी फेम अभिनेत्री तन्वीने देखील धुळवड निमित्त खास फोटो शेयर केले आहेत.

इथे पहा मराठी कलाकारांचे होळीचे फोटो:-

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts