मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आणि महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बोरीवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंबर कोठारे यांचा जन्म १४ एप्रिल १९२६ रोजी मुंबईमध्ये झाला होता. त्यांचे बालपण खूपच हलाखीमध्ये गेले. घरची परिस्थिती खूपच बिकट असल्यामुळे त्यांना लहानपणीच वेगवेगळी कामे करावी लागली. दिवाळीच्या काळामध्ये त्यांनी रस्त्यावर उटणे विकण्याचे देखील काम केले.
अंबर कोठारे यांनी नोकरी करण्यासोबत चित्रपटांमध्ये काम देखील केले. सुरुवातीला त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. झोपी गेलेला जागा झाला या नाटकासाठी त्याने शेकडो प्रयोग केले त्याचबरोबर त्यांनी अनेक नाटकांची निर्मित देखील केली.
अभिनेते महेश कोठारे यांच्या जडणघडणमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. महेश कोठारे यांची निर्मिती-दिग्दर्शन क्षेत्रामधील पदार्पण असलेला ‘धुमधडाका’ हा चित्रपट सर्वतोपरी चांगला होण्यासाठी अंबर कोठारे यांनी भरपूर कष्ट घेतले होते. त्याचबरोबर त्यांनी दे दणादण चित्रपटामध्ये देखील काम केले. महेश कोठारे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या.
नाटकामधील झुंजारराव हि त्यांची भूमिका दर्शकांना खूपच आवडली होती. नाटकामध्ये काम करत असताना त्यांनी बॅंकेमध्ये देखील नोकरी केली. अंबर कोठारे यांच्या निधनाने महेश कोठारे आणि त्यांच्या कुटुंबाला मोठं धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मिडियावरून त्यांना श्रद्धांजली दिली आहे.
View this post on Instagram